नॅशनल क्रश रोहित सराफने मिस्मॅच सीझन 3 चे चित्रीकरण केलं सुरू
नॅशनल क्रश रोहित सराफने त्याचा आगामी मिस्मॅच ३ चे चित्रीकरण सुरू केले आहे. आता नव्या सीजन ची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. रोहित ने त्याच्या इंस्टाग्रामवर चित्रीकरणाची एक झलक शेअर केली आहे आणि शूटिंग सुरू झाल्याची बातमी दिली आहे. रोहित सराफ तिसर्यांदा ऋषीच्या भूमिकेत दिसणार आहे.
रोहित सराफ आणि प्राजक्ता कोळी अभिनीत Netflix ची लाडकी रोमँटिक वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आकर्षक कथानकासाठी ही वेब सीरिज ओळखली जाते आणि मनमोहक केमिस्ट्रीबद्दल सगळेच उत्सुक आहेत.
मिस्मॅच सीझन 3 चे शूट सुरू झालं असून आता प्रेक्षक या वेब सीरिज ची वाट बघत आहेत. रोहितकडेही इश्क विश्क रिबाउंड हा प्रोजेक्ट सुद्धा आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.