'तारक मेहता..' चा प्रोमो पाहताच नेटकरांनी मालिकेवर टाकला बहिष्कार
टेलिव्हिजनवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेला आजवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.मात्र गेल्या काही काळापासून या मालिकेबाबत वाद सुरू आहे. यातील बऱ्याच कलाकारांनी मालिकेचा निरोप घेतला. निर्मात्यांनी नुकताच चाहत्यांना दिलासा देत दयाबेनची वापसी होणार असल्याची गुडन्यूज दिली होती. दयाबेनची वापसी होणार म्हणून चाहते खूप उत्सुक होते. मात्र मालिकेत तसं काही घडलंच नाही. खरंतर मालिकेतील बऱ्याच एपिसोड्समध्ये दयाबेनच्या वापसीबद्दलची कथा दाखवली जात होती.मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये दाखवलं की दयाबेन येणार नाही. दयाबेन नाही येणार हे समजताच गोकुलधाम सोसायटीमधील सर्वजणांचा राग अनावर होतो, असं यामध्ये दाखवलं गेलंय. मात्र केवळ सोसायटीचे लोकच नाहीत तर निर्मात्यांच्या या खेळीवर आता प्रेक्षकसुद्धा चिडले आहेत. इतकंच नव्हे तर अनेकांनी मालिकेवर बंदीची मागणी केली आहे.नेटकरी तर अपशब्दात मालिकेवर बहिष्कार ताक आहेत.15 वर्षांपासून या मालिकेलने प्रेक्षकांनी मनोरंजन केले आहे.पण निर्मात्यांनी दिलेल्या खोट्या आशेमुळे हि मालिका डागमागीला आली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.