U-Turn ते Shehar Lakhot प्रियांशू पैन्युलीची कलाकारी कारकीर्द
वर्षाची सुरुवात प्रियांशूच्या "यू-टर्न" पासून झाली आणि वर्षभरात "पिप्पा" आणि "चार्ली चोप्रा आणि द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली" अश्या अनेक उत्तोत्तम प्रोजेक्ट्स मधून तो चर्चेत राहिला सोबतीला "शेहर लखोत" मधील त्याचा अनोखा अभिनय प्रेक्षकांना मोहित करून गेला.
प्रियांशू पैन्युलीसाठी हे वर्ष डायनॅमिक ठरलं विविध भूमिका साकारून त्याने हे वर्ष खास केलं आहे. "U-Turn" मध्ये त्याने एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली तर "पिप्पा" मध्ये मेजर राम मेहता म्हणून आपली अष्टपैलुत्व अभिनय त्याने दाखवून दिला. "चार्ली चोप्रा अँड द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली" या वेबसिरीजमधील त्याच्या अनोख्या अभिनयाने तो चर्चेत राहिला आणि "शेहर लखोत" मध्ये पेन्युलीने मुख्य पात्र देव तोमरची भूमिका साकारून त्याने प्रेक्षकांना आपलंसं केलं.
प्रियांशू पैन्युली हा वर्षभरात विविध भूमिका करून चर्चेचा विषय तर ठरला पण अनेक भूमिका या आकर्षित पने साकारून त्याने प्रेक्षकांना मोहित केलं आहे. 2023 हे वर्ष त्याच्या भरभराटीच ठरलं यात शंका नाही !
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.