रणदीप आणि लिनच्या रिसेप्शन लुकची रंगली चर्चा
नोव्हेंबर २०२३ च्या शेवटी जेव्हा बॉलीवूड अभिनेता रणदीप हुडा आणि मॉडेल लिन लैश्राम यांनी इंफाळ, मणिपूर येथे पारंपारिक लग्नात गाठ बांधली तेव्हा इंटरनेट वरती या जोडीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता दोन आठवड्यानंतर, या जोडीचा भव्य असा रिसेप्शन सोहळा मुंबईमध्ये पार पडत आहे.यावेळी रणदीप आणि लिन वरती सर्वांच्या नजरा खेळून होत्या. दोघेही पूर्णपणे मनमोहक दिसत होते. रणदीपने ट्राउझर्सच्या जोडीसह एक उत्कृष्ट बांधगला परिधान केला होता, तर लिनने चमकदार लाल लेहेंगा घातला होता. दोन्ही पोशाख डिझायनर लेबल रोहित गांधी आणि राहुल खन्ना यांनी तयार केले आहेत.
रणदीपच्या ड्रेसला सोन्याची बटणे आणि कफ असलेली नाजूक फुलांची नक्षी बसवण्यात आली आहे. लिनचा लाल रंगाचा ओम्ब्रे लेहेंगा आणि त्यात चमकदार सेक्विनसह नाजूक सजावट केली आहे. डोक्यावर पदर म्हणून लिनने दुपट्टा घेतला आहे. तिने स्टेटमेंट डायमंड नेकलेस आणि झुकत्या कानातल्यांच्या जोडीने लुक ऍक्सेसरीझ केलाय. लिनने न्यूड मेकअप मेकअप ठेवला होता.ज्यामध्ये लिनने डोळ्यात पुरेसा मस्करा, गुलाबी गालाची छटा आणि नग्न ओठांचा रंग लावला होता. दोघेही अतिशय सुंदर आणि एकमेकांना साजेसे दिसत होते.या कार्यक्रमासाठी सर्व बॉलीवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. उर्वशी रौतेला, तमन्ना आणि विजय शर्मा सह अनेक सेलिब्रिटी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.