शंभराव्या नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्याचा प्रशासनाकडून आढावा
पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा पुण्यात ५ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यानिमित्त शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री सुधीर सुधीर मुगगंटीवार, स्वागताध्यक्ष शरद पवार, निमंत्रक उदय सामंत यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा आज जिल्हा व महापालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला.
यावेळी पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे शाखा अध्यक्ष मेघराज राजेभोसले, पोलीस निरीक्षक सुनील झावरे , सह पोलीस निरीक्षक अश्विनी बावचे , युवा सेनेचे प्रदेश सचिव किरण साळी, उप अभियंता संतोष लांजेकर, नाट्य परिषदेचे दिपक रेगे, विजय पटवर्धन, सतीश लोटके, सत्यजित धांडेकर, समीर हंपी, शोभा कुलकर्णी, अशोक जाधव सर्व कार्यकारणी सदस्य आणि प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पार्किंग व्यवस्था, स्वच्छतागृहे, सुरक्षा व्यवस्था यांचा आढावा घेण्यात आला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.