ओटीटी ते थिएटर बॉलिवुडचा बाप अनिल कपूर यांच्यासाठीच अनोखं वर्ष
द नाईट मॅनेजर मध्ये शेली रुंगटा ची भूमिका साकारण्यापासून ते अॅनिमलमधील उद्योगपती बलबीर सिंगपर्यंत अभिनेता अनिल कपूर हा यंदाच्या वर्षाचा बॉलीवूडचा "बाप" ठरला आहे. 2023 वर्षात त्याने टेलिव्हिजन पासून सिनेमा पर्यंत असा अनोखा प्रवास करत अभिनयातून प्रेक्षकांची मन जिंकली आणि वर्चस्व गाजवले.
अनिल कपूर यांच्यासाठी हे वर्ष अधिक रोमांचक बनवणारी गोष्ट म्हणजे बॉक्स ऑफिसवर अॅनिमल ने दमदार कमाई करून यंदाच्या वर्षातला सर्वोत्तम चित्रपट ठरला. नाईट मॅनेजर आणि अॅनिमल या दोन्ही प्रोजेक्ट मध्ये त्याने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आणि " बॉलिवुड चा बाप " ही पदवी कमावली.
अनिल कपूर येणाऱ्या वर्षात त्याच्या आगामी रिलीज फायटर साठी सज्ज आहेत. एरियल अॅक्शन चित्रपटाची पर्वणी यातून अनुभवयाला मिळणार असून जिथे ते कमांडिंग ऑफिसरची भूमिका साकारणार आहेत. नव्या वर्षात 25 जानेवारी ला फायटर रिलीज होणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.