आरोपी विविध शहरातील तात्पुरत्या स्वरुपात तयार केलेल्या फर्मचा दाखला देऊन व्यापाऱ्यांची फसवणूक करायचा. गेल्या एक वर्षापासून हा आरोपी फरार होता. अखेर स्वारगेट पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
खराळवाडी भागातील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत शनिवारी पहाटेच्या सुमारास शॉट सर्किट झाले. यामुळे लागलेल्या भीषण आगीत बँकेतील फर्निचर व कागदपत्रे जळून खाक झाले आहेत.
पुण्यातील वाघोली येथील उबाळेनगर परिसरात असलेल्या "शुभ सजावट" या मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोडाउनला भीषण आग लागली होती. या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. गोडाऊनमधील ४ सिलेंडर फुटल्याने ही आग लागल्याचे...
भावनिक साद घालून जीवलग मैत्रिणीच्या नावावर ८० लाख रुपयांचे कर्ज काढल्यानंतर काही काळाने ते फेडण्यास नकार देण्याचा प्रकार बिबवेवाडीत घडला. या प्रकरणी ६९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार देण्यात आली ...
पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर विनयकुमार चौबे यांच्या रूपाने पाच वर्षांत प्रथमच पोलीस आयुक्तांनी नागरिकांशी ट्विटरवरून थेट संवाद साधला.
पुणे रेल्वे स्थानक परिसरात युवकाला बेदम मारहाण करून लुटण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी दोघांना अटक केली. किरण धनराज खरात (वय २८, रा. ताडीवाला रोड) आणि आफताब अयुब शेख (वय २२, रा...
शहरात 'ऑनलाइन टास्क'च्या आमिषाने नफा मिळवून देण्याचे प्रकार वाढीस लागले असून सायबर चोरट्यांनी एका व्यावसायिकाला ९६ लाख ५७ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला आहे.
पुणे- पानशेत रस्त्यावर खडकवासला चौपाटी परिसरात शुक्रवार, ५ मे रोजी पहाटे अडीचच्या सुमारास दुचाकीला इनोव्हा कारने समोरून जोरदार धडक दिली. या धडकेने एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून दुसऱ्या तरु...
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) मध्ये क्लिनर म्हणून काम करणारे ३७ वर्षीय इंद्रजित मोहिरे यांना आयुष्यभराच्या अपंगत्वाला सामोरे जावे लागणार आहे. त्यांची चूक काय तर कोथरूड डेपोच्या ट्रा...
पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील गटारांची साफसफाई करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, साफसफाई करताना गटारातील गाळ रस्त्यावरच टाकला जात आहे. बराच वेळ तो रस्त्यावरच पडून राहिल्याचे दिसते. ...