Nigdi : निगडी भुयारी मार्ग बनला दारुड्यांचा अड्डा

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी-चिंचवड महापालिकेने नुकत्याच बांधलेल्या निगडी येथील भुयारी मार्गाबाबत नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. माजी नगरसेविका शर्मिला बाबर यांनी या समस्यांवर त्वरित तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे मागणी केली आहे.

संग्रहित छायाचित्र

भुयारी मार्गातील समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी-चिंचवड महापालिकेने नुकत्याच बांधलेल्या निगडी येथील भुयारी मार्गाबाबत नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. माजी नगरसेविका शर्मिला बाबर यांनी या समस्यांवर त्वरित तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे मागणी केली आहे.

सदर भुयारी मार्गाच्या जवळच असलेल्या तीन दारूच्या दुकानांमुळे हा मार्ग मद्यपींचा अड्डा बनला आहे. दारुडे येथे दारू पिणे, झोपणे, आणि कचरा टाकणे यासारख्या गैरप्रकारांमध्ये गुंतलेले दिसतात. यामुळे नागरिकांचा या मार्गाचा वापर कमी झाला असून, जेष्ठ नागरिक, महिला, आणि लहान मुले भयभीत होत आहेत.

भुयारी मार्गात सुरक्षा रक्षक असूनही, तो कधीच जागेवर नसतो, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. रस्त्यावरील या असुरक्षिततेमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. माजी नगरसेविका शर्मिला बाबर यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी संघटनेने मागणी केली आहे की, या भुयारी मार्गातील सर्व समस्या त्वरित सोडवण्यात याव्यात. अन्यथा मार्ग बंद करून टाकण्याचा किंवा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या आहेत नागरिकांच्या मागण्या

  1. भुयारी मार्गातील गैरप्रकार थांबवणे.
  2. दारूच्या दुकानांवर नियंत्रण आणणे.
  3. सुरक्षा रक्षकांची योग्य तैनाती व सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे.
  4. महापालिकेने या समस्येवर त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी नागरिक आणि व्यापारी करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest