वाघोलीत गोडाउनला भीषण आग, तीन जणांचा होरपळून मृत्यू

पुण्यातील वाघोली येथील उबाळेनगर परिसरात असलेल्या "शुभ सजावट" या मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोडाउनला भीषण आग लागली होती. या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. गोडाऊनमधील ४ सिलेंडर फुटल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Sat, 6 May 2023
  • 09:44 am
वाघोलीत गोडाउनला भीषण आग, तीन जणांचा होरपळून मृत्यू

वाघोलीत गोडाउनला भीषण आग, तीन जणांचा होरपळून मृत्यू

गॅस सिलेंडर फुटल्याने लागली आग

 

पुण्यातील वाघोली येथील उबाळेनगर परिसरात असलेल्या "शुभ सजावट" या मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोडाउनला भीषण आग लागली होती. या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. गोडाऊनमधील ४ सिलेंडर फुटल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात आले आहे.

वाघोलीतील उबाळेनगर परिसरात शुभ सजावट या मंडपाचे साहित्या असणारे गोडाउन आहे. या गोडाउनमध्ये रात्री ११ च्या सुमारास अचानक चार गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यामुळे सर्व गोडाउनला आग लागली. आगीची माहिती मिळताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

घटनास्थळी दाखल होताच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. कारण गोडाउनच्या शेजारीच ४०० सिलेंडरने भरलेले आणखी एक गोडाऊन होते. मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोडाउनची आग शेजारच्या गोडाउनला लागली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. सुदैवाने मोठा धोका टळला. मात्र, साहित्याच्या गोडाउनच्या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest