Rape : बलात्कार केल्याप्रकरणी भारतीय वंशाचा तरुण दोषी

ऑस्ट्रेलियातील एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला पाच कोरियन महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. भारतीय राजकारणातील बड्या नेत्यांशी संबंध असलेल्या ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाचा प्रमुख सदस्य बालेश धनखर याच्यावर जानेवारी ते ऑक्टोबर २०१८ या कालावधीत झालेल्या बलात्काराच्या ३९ आरोपांपैकी १३ आरोपांबद्दल न्यायालयात खटला चालवण्यात आला होता. सोमवारी सिडनीच्या जिल्हा न्यायालयातील ज्यूरींनी त्याला या सर्व आरोपांमध्ये दोषी ठरवले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 26 Apr 2023
  • 01:29 pm
बलात्कार केल्याप्रकरणी भारतीय वंशाचा तरुण दोषी

बलात्कार केल्याप्रकरणी भारतीय वंशाचा तरुण दोषी

अमली पदार्थ देऊन केला पाच कोरियन तरुणींवर बलात्कार

#मेलबर्न

ऑस्ट्रेलियातील एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला पाच कोरियन महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. भारतीय राजकारणातील बड्या नेत्यांशी संबंध असलेल्या ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाचा प्रमुख सदस्य बालेश धनखर याच्यावर जानेवारी ते ऑक्टोबर २०१८ या कालावधीत झालेल्या बलात्काराच्या ३९ आरोपांपैकी १३ आरोपांबद्दल न्यायालयात खटला चालवण्यात आला होता. सोमवारी सिडनीच्या जिल्हा न्यायालयातील ज्यूरींनी त्याला या सर्व आरोपांमध्ये दोषी ठरवले आहे.

ज्यूरींच्या फोरमनने 'दोषी' ठरवल्यानंतर ४३ वर्षीय बालेशला रडू कोसळले होते. मे महिन्यात त्याला पुन्हा न्यायालयीन कामकाजाला सामोरे जावे लागणार आहे. या वर्षाच्या अखेरीस त्याला शिक्षा सुनावली जाईल. बालेश ऑस्ट्रेलियात डेटा एक्स्पर्ट म्हणून काम करत होता. कोरियन भाषांतरासाठी बनावट नोकऱ्यांची जाहिरात करून तो तरुणींना आपल्या जाळ्यात अडकवत असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तरुणींना भेटण्यासाठी तो हॉटेल, कॅफे आणि कोरियन रेस्टॉरंटचा वापर करत असे. त्यानंतर तो तरुणींना सिडनी सीबीडीमधील आपल्या स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये खोट्या बहाण्याने घेऊन जायचा, असा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला.

रोजगाराच्या आमिषाने त्याच्या जाळ्यात अडकलेली युवती त्याच्यासोबत त्याच्या सदनिकेत आली की तो तिच्या वाईन आणि इतर शीतपेयांमध्ये 'स्टिलनॉक्स' या झोपेच्या गोळ्या टाकत  होता. बऱ्याच वेळा धनखरने या युवतींना गुंगी यावी यासाठी 'रोहिप्नॉल'च्या गोळ्यांचा वापर केल्याचे समोर आले आहे. या गोळ्या ऑस्ट्रेलियात 'डेट रेप ड्रग' म्हणून ओळखल्या जातात. बहुतांश बलात्कार प्रकरणात या गोळ्यांचा गैरवापर झाल्याचे तपास अधिकाऱ्यांनी उघड केलेले आहे. धनखरने आपल्या बेडसाईड अलार्म घड्याळात लपवलेल्या कॅमेऱ्यात आणि मोबाइलमध्ये बलात्काराचे चित्रीकरण केले होते, जे पोलिसांनी जप्त केल्याची माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयात सादर केली आहे.

ऑक्टोबर २०१८ मध्ये पोलिसांनी धनखर याच्या अपार्टमेंटची झडती घेतली असता, त्यांना विविध महिलांसोबत लैंगिक संबंध ठेवतानाचे ४७ व्हीडीओ सापडले, त्यापैकी काही महिला बेशुद्ध अवस्थेत होत्या, तर काही जणी धडपडत होत्या. विवाहबाह्य संबंध तुटल्यानंतर आपण एकटे पडलो म्हणून महिलांशी खोटे बोलून संबंध ठेवल्याचे धनखरने त्याच्या बचावात म्हटले आहे.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest