संग्रहित छायाचित्र
कॅनडाच्या रॉयल कॅनडियन माऊंटेड पोलीस दलाचे आयुक्त माईक दुहेम यांनी शीख फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्या आणि त्यांनतर झालेल्या हिंसक घडामोंडीना भारतीय एजंटस् जबाबदार असल्याचे आक्षेपार्ह विधान केले होते. मात्र कॅनडाने या आपल्या भूमिकेपासून घुमजाव केले आहे. कॅनडामधील शीख फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्या प्रकरणासह कॅनडामधील गुन्हेगारी जगताशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे नाव जोडण्याचे वृत्त चुकीचे आणि काल्पनिक असल्याचे कॅनडाने म्हटले आहे.
कॅनडाच्या पंतप्रधानांच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि गुप्तवार्ता सल्लागार नथाली ड्रौइन यांनी या वृत्ताचे खंडन केले. राष्टीय सुरक्षेशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा दाखला देऊन ‘द ग्लोब अँड मेल’ वृत्तपत्राने संबंधित वृत्त प्रसिद्ध झाले होते. या अधिकाऱ्याचे नाव वृत्तात दिले नव्हते. या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निज्जर हत्येसह इतर कटांची माहिती होती, असे कॅनडातील सुरक्षा यंत्रणांना खात्रीने वाटत होते. कॅनडा आणि अमेरिकेच्या गुप्तचर खात्याने या हत्याकटात अमित शहा आणि डोवाल, जयशंकर यांचेही नाव घेतले. या वृत्तावर आक्षेप घेऊन भारताने तीव्र शब्दांत खंडन केले.
‘रॉयल कॅनडिअन माउंटेड पोलीस’ (आरसीएमपी) आयुक्त माइक दुहेमे यांनी १४ ऑक्टोबर रोजी कॅनडामध्ये पसरत चाललेल्या हिंसेला भारतातील एजंट्स जबाबदार असल्याचा दावा केला होता. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनीही नंतर आक्षेपार्ह विधाने केली होती. कॅनडाचे उपपरराष्ट्रमंत्री डेव्हिड मॉरिसन यांनी गृहमंत्री अमित शहा यांनी कॅनडामधील शीख फुटीरतावाद्यांना लक्ष्य करण्याचे आदेश दिल्याचे वक्तव्य केले होते. कॅनडाचे पुराव्याशिवाय केलेल्या आरोपामुळे नाचक्की कॅनडाच्या ‘प्राइव्ही काउन्सिल ऑफिस’ने निवेदन प्रसिद्ध केले.