भारताची मतदानप्रणाली लय भारी; एलॉन मस्क झाले भारत निवडणूक आयोगाचे फॅन

न्यूयॉर्क : टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर समर्थक एलॉन मस्क देखील भारताच्या मतदान प्रणालीचे फॅन बनले आहेत. मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत अमेरिकन निवडणूक यंत्रणेवर टीका केली आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

अमेरिकेच्या प्रणालीबाबत व्यक्त केला संशय

न्यूयॉर्क : टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर समर्थक एलॉन मस्क देखील भारताच्या मतदान प्रणालीचे फॅन बनले आहेत. मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत अमेरिकन निवडणूक यंत्रणेवर टीका केली आहे. मस्क यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की,  कॅलिफोर्नियातील निवडणुकीनंतर एका दिवसात भारताने ६४ कोटी मतांची मोजणी केली,  तर १५ दिवस उलटूनही कॅलिफोर्नियात अजूनही मतमोजणी सुरू आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या नियोजनाचे कौतुक करावेच लागेल.

अमेरिकेत ५ नोव्हेंबरला निवडणुका झाल्या. निवडणूक होऊन १८ दिवस झाले आहेत. कॅलिफोर्नियामध्ये अजूनही २ लाखांहून अधिक मतांची मोजणी सुरू आहे. अमेरिकेच्या निवडणुकीनंतर रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प विजयी घोषित झाले आहेत. रिपब्लिकन पक्षाला ३१२ इलेक्टोरल मते मिळाली आहेत. बहुमतासाठी केवळ २७० इलेक्टोरल मतांची गरज होती. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना २६६ इलेक्टोरल मते मिळाली. ज्यो बायडन सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. २० जानेवारीला कॅपिटल हिलवर सत्तेचे हस्तांतर केले जाणार आहे. यानंतर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करतील.

एलॉन मस्क यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे आहे कारण ते अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्यांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले होते. मतमोजणीसाठी संगणकावर विश्वास ठेवता येणार नाही, असा दावा त्यांनी केला. निवडणुका बॅलेट पेपरवर व्हायला हव्या असे मत त्यांनी व्यक्त केले होते.  इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन हॅक करणे सोपे असल्याचे देखील त्यांनी म्हटले होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ६४.२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, असे निवडणूक आयोगाने म्हटले होते. हा एक विश्वविक्रम असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. जी-७ देशांमध्ये भारतात दीडपट तर युरोपियन युनियनच्या २७ देशांपेक्षा ही संख्या अडीच पटीने अधिक आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest