संग्रहित छायाचित्र
नैरोबी : अमेरिकेने अदानी समुहाच्या गौतम अदानी आणि पुतण्या सागर अदानी यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केल्यानंतर भारतीय शेअर बाजार कोसळला. त्यानंतर अदानी समुहाचा या संदर्भातील खुलासादेखील आला. परंतु अमेरित झालेल्या या घडामोडींचा परिणाम आंतराष्ट्रीय स्तरावर झाला. कारण केनियाचे राष्ट्राध्यक्ष विल्यम रुटो यांनी अदानी समूहाचा प्रस्तावित विमानतळ विस्ताराचा प्रकल्प आणि ऊर्जा प्रकल्पांना रद्दबातल केले. अमेरिकेत अदानीं झालेले आरोप दाखल झालेला गुन्हा या खळबळजनक घडामोडीनंतर केनियाने हे पाऊल उचलले आहे.
अदानी समूहाशी भागीदारी केल्यामुळे केनियातील मूळ कंपनीविरोधात गेल्या काही काळापासून निदर्शने सुरू होती. सप्टेंबर महिन्यात विमानतळ कर्मचाऱ्यांनीही बंद पुकारला होता. या करारामुळे त्यांच्या नोकऱ्यांवर गदा येईल आणि कामाच्या ठिकाणी अडचणी निर्माण होतील, असा आरोप कामगार संघटनांनी केला होता.
केनिया सरकारने काढलेल्या विमानतळ विस्तार आणि ऊर्जा प्रकल्पांच्या निविदांना अदानी समूहाने बोली लावली होती. या प्रस्तावित प्रकल्पामध्ये जोमो केन्याटा आंतरराष्ट्रीय विमानतलावर आणखी एक धावपट्टी जोडण्यात येणार होती. त्याच बरोबर अदानी समुह पुढील ३० वर्षांच्या करारावर प्रवासी टर्मिनलचे आधुनिकरण करणार होते. केनीयातील विमानतळ विस्तार किंमत ७०० दशलक्ष डॉलर तर ऊर्जा प्रकल्पाची किंमत १.८ अब्ज डॉलर असल्याचे सांगितले जात आहे.
केनियाच्या राष्ट्रीस संसदेमध्ये राष्ट्राध्यक्ष विल्यम रुटो यांनी वाहतूक आणि ऊर्जा व पेट्रोलियम मंत्रालयाला मी हे प्रकल्प तात्काळ रद्द करण्याचे आदेश दिले आहेत, असे घोषित केले. त्यांनी यावर बोलताना असेहि सांगितले की आपल्या सहयोगी देशातील तपास यंत्रणांनी महत्त्वाची माहिती दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात येत आहे. रुटो यांनी ही घोषणा केल्यानंतर केनियाच्या संसदेत उपस्थित खासदारांनी टाळ्या वाजवून या निर्णयाचे स्वागत केले. बराच वेळ टाळ्या वाजत राहिल्या. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
केनियन वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार राष्ट्राध्यक्ष रुटो संसदेत बोलताना म्हणाले, “भ्रष्टाराचाराबद्दल समोर आलेले पुरावे आणि विश्वासार्ह माहितीच्या आधारावर मी निर्णय घेण्यास मी मागेपुढे पाहणार नाही.” केनियामध्ये ३० वर्षांपासून विमानतळाचे नियंत्रण करणाऱ्या कंपनीशी अदानी समूहाने भागीदारी करत नैरोबीमधील मुख्य विमानतळाचे आधुनिकीकरण करण्यासाठी करार केला होता. अतिरिक्त धावपट्टी आणि टर्मिनल बांधून देण्यासाठी करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या.
गुरुवार (दि. २१) रोजी केनियाचे ऊर्जा मंत्री ओपियो वांडाई यांनी संसदेच्या सदस्यांनी सांगितले की वीज वाहिनींच्या कामाचे कंत्रात पुढे जाईल अशी अपेक्षा आहे. कारण या कामाच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची लाच किंवा भ्रष्टाचार नव्हता. सार्वजनिक वितरणव्यवस्थेचे तज्ज्ञ असलेले केनियाचे वकील जॉर्ज कामाऊ म्हणाले की, अदानी समूह कंत्राट रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी कायदेशीर लवादाकडे जाऊ शकतो, विशेषत: वीज वाहिनींचा करार, ज्यावर आधीच स्वाक्षरी झालेली होती. “ते म्हणाले, कोणत्याही विवाद निकाली काढण्याची जी चौकट आहे ती केनियन सरकारकडे झुकण्याची संभावना अधिक आहे कारण अध्यक्षांनी अखंडतेच्या मुद्द्यांवर हा करार रद्द केला आहे.”
गौतमी अदानी यांची प्रतिक्रिया
अदाणी समुदायाचे संस्थापक गौतम अदाणी यांनी २५० दशलक्ष डॉलर्सची लाच देऊ केल्याचे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. अदाणी समूहाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात भ्रष्टाचाराच्या सर्व आरोपांचे खंडन करण्यात आले आहे. “अमेरिकेच्या विधी विभागाकडून ‘अदानी ग्रीन्स’च्या संचालकांवर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार असून आम्ही ते सर्व आरोप फेटाळत आहोत”.
“अमेरिकेच्या विधी विभागानेच नमूद केल्याप्रमाणे अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये दाखल करण्यात आलेले गुन्हे तोपर्यंत फक्त आरोप ठरतात, जोपर्यंत ते सिद्ध होत नाहीत. तोपर्यंत संबंधित आरोपी हा निर्दोषच असतो. या प्रकरणात आम्ही शक्य त्या सर्व कायदेशीर बाबींची विचार करत आहोत”, असेही अदाणी समूहाकडून सांगण्यात आलं आहे.