जगातील सर्वात महागड्या गुलाबी हिऱ्याचा लिलाव
#न्यूयॉर्क
जगातील दुर्मीळ हिऱ्याची नुकतीच विक्री झाली आहे, ५५.२ कॅरेटच्या या दुर्मीळ हिऱ्याचा न्यूयॉर्कमध्ये लिलाव करण्यात आला. हा हिरा २८७ कोटी रुपयांना विकला गेला आहे. दुर्मीळ गुलाबी हिऱ्यांच्या श्रेणीतील हा सर्वात मोठा, सर्वात मौल्यवान हिरा समजला जातो.
या हिऱ्याचा लिलाव या महिन्याच्या सुरुवातीला झाला होता. फ्युरा जेम्स या हिऱ्यांचा व्यवसाय करणाऱ्या कॅनेडियन कंपनीला आफ्रिकेतील एका खाणीत हा हिरा सापडला होता. फॅन्सी आणि गुलाबी रंगाच्या या हिऱ्याने जागतिक विक्रम केला आहे. हा जगातील सर्वात महागडा हिरा आहे, जो कोट्यवधींमध्ये विकला गेला आहे. हा हिरा ३४.८ दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे २८७ कोटी रुपयांना विकला गेला आहे. ज्याला "द इटरनल पिंक" असे नाव देण्यात आले आहे. लिलावापूर्वी हा हिरा अंदाजे ३५ दशलक्ष डॉलर्सला विकला जाईल, असा अंदाज होता. या हिऱ्यापूर्वी, जांभळ्या-गुलाबी हिऱ्याचा या पूर्वीचा सर्वाधिक किमतीला विकले जाण्याचा विक्रम २०१९ मध्ये नोंदवण्यात आलेला आहे. २०१९ ला हाँगकाँगमधील सोथेबी येथे १०.६४ कॅरेटचा हिरा १९.९ दशलक्ष डॉलर किमतीला विकला गेला. जाणकारांच्या मते इतर रत्नांच्या तुलनेत हे सर्वात महाग आणि मौल्यवान रत्न होते. बोत्सवानामधील दमात्शा खाणीत डी बियर्सने "द इटरनल पिंक" हा हिरा शोधला होता.