उत्तर कोरिया करणार अमेरिकेशी दोन हात ?
#सेऊल
उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोग अमेरिकेशी दोन हात करण्याच्या तयारीला लागला असल्याचे समोर आले आहे. उत्तर कोरियाकडून रविवारी पुन्हा एकदा आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली असून ८ लाख नागरिक लष्करात भरती होण्यासाठी उत्सुक असल्याचे विधान उत्तर कोरियाच्या परराष्ट्र विभागाने केले आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर कोरियाकडून लष्करी ताकद वाढवण्यावर भर दिला जात आहे. उत्तर कोरियाने रविवारी समुद्राच्या दिशेने एक लहान-पल्ल्याचे आंतरखंडीय क्षेपणास्त्र सोडले आहे. दक्षिण कोरियाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
दक्षिण कोरियाच्या संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाच्या वायव्य भागातून रविवारी सकाळी आंतरखंडीय क्षेपणास्त्र सोडण्यात आले आहे. उत्तर कोरियाने प्रक्षेपित केलेल्या क्षेपणास्त्राने त्याच्या पूर्व किनारपट्टीवरील पाण्यात उतरण्यापूर्वी देशभरातून उड्डाण केले. दक्षिण कोरियाच्या सैन्याने उत्तर कोरियावर अधिक पाळत ठेवण्यास सुरुवात केली आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यातील सलोख्यामुळे किम जोंग उन त्रस्त आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यात संयुक्त लष्करी सराव
सुरू आहे. वृत्तसंस्था