मुईझ्झू शपथविधीस येणार?

भारतातील लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीच्या सोहळ्याला जगातील अनेक नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, श्रीलंकेचे राष्ट्रपती रॉनिल विक्रमसिंघे यांना आमंत्रित केल्याचं वृत्त आहे. तसेच नेपाळ आणि मॉरिशसच्या प्रमुखांनाही सोहळ्यासाठी निमंत्रण दिलं आहे. त्याचबरोबर या शपथविधी सोहळ्यासाठी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुईझ्झू यांनाही निमंत्रण दिल्याचे वृत्त आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Sat, 8 Jun 2024
  • 06:30 pm

संग्रहित छायाचित्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, मॉरिशस आदी देशांच्या प्रमुखांना निमंत्रण

#माले 
भारतातील लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीच्या सोहळ्याला जगातील अनेक नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, श्रीलंकेचे राष्ट्रपती रॉनिल विक्रमसिंघे यांना आमंत्रित केल्याचं वृत्त आहे. तसेच नेपाळ आणि मॉरिशसच्या प्रमुखांनाही सोहळ्यासाठी निमंत्रण दिलं आहे. त्याचबरोबर या शपथविधी सोहळ्यासाठी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुईझ्झू यांनाही निमंत्रण दिल्याचे वृत्त आहे. चीन समर्थक मोहम्मद  मुईझ्झू यांनी गेल्या काही दिवसांत भारतविरोधी भूमिका घेतली आहे. त्यांनी सत्तेवर आल्यानंतर चीनच्या दबावाला बळी पडून तेथील भारतीय सैनिक मागे घेण्याची आग्रही सूचना केली होती. त्यानुसार भारताने तेथील सैनिक मागेही घेतले. आता या पार्श्वभूमीवर मुईझ्झू शपथविधी सोहळ्याला येणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.         

 ‘एनडीए’च्या प्रमुखपदी एकमताने नरेंद्र मोदी यांची नियुक्ती झाली आहे. तसेच शुक्रवारी दिल्लीत एनडीएच्या संसदीय दलाची संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक पार पडली. बैठकीत एनडीएच्या सर्व नेत्यांनी नरेंद्र मोदी यांची संसदीय दलाचे नेते म्हणून निवड केली. आता नरेंद्र मोदी रविवारी, ९ जून रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी विविध परदेशी पाहुण्यांनाही आमंत्रण दिले असल्याची माहिती आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप बेटांना भेट दिली होती. नरेंद्र मोदींनी या दौऱ्यानंतरचे काही फोटो समाजमाध्यमांवर शेअर केले होते. भारत गेल्या काही महिन्यांपासून लक्षद्वीपचा आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून प्रचार करत असतानाच स्वतः पंतप्रधान मोदी यांनी यासाठी पुढाकार घेतल्यानंतर अनेकांचं लक्ष लक्षद्वीपकडे वळलं. मात्र, त्यानंतर मालदीव देशातील काही लोकांचा तिळपापड झाला. मालदीवमधील काही नागरिकांनी आणि मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुईझ्झू यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी आक्षेपार्ह टिप्पण्णी केली होती. त्यातच मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुईझ्झू यांनी भारतीय सैन्य माघारी घेण्यास सांगितले होते. त्यामुळे भारत आणि मालदीवमधील संबंध ताणले गेले होते.

आता नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुईझ्झू यांनाही देण्यात आलं आहे. त्यामुळे मालदीव आणि भारताचे संबंध सुधारण्यासाठी मालदीवकडे ही एक संधी असणार आहे. त्यामुळे शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद  मुईझ्झू स्वीकारणार का? तसेच सोहळ्यासाठी उपस्थित राहणार का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. दरम्यान, मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर विराजमान होणार असल्याच्या वृत्तानंतर जगभरातील नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक, इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, जर्मन चॅन्सेलर ओलाफ स्कोल्झ आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यासह ७५ हून अधिक जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. यात मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचाही समावेश आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest