इराणमध्ये सापडले 'पांढरे सोने'

काही दिवसांपूर्वी भारतात लिथियमचा साठा सापडल्याचे वृत्त समोर आले होते. आता त्यानंतर पश्चिमी प्रांतात लिथियमचा मोठा साठा आढळला असल्याचे इराणने म्हटले आहे. पारंपरिक इंधनाला पर्याय म्हणून जगभरात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर होऊ लागल्याने लिथियमला मागणी वाढली आहे. लिथियमला पांढरे सोने असे म्हटले जाते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 8 Mar 2023
  • 12:35 am
इराणमध्ये सापडले 'पांढरे सोने'

इराणमध्ये सापडले 'पांढरे सोने'

हमीदन येथे लिथियमचा साठा; सोन्या-चांदीपेक्षाही लिथियमला जास्त मागणी

#तेहरान

काही दिवसांपूर्वी भारतात लिथियमचा साठा सापडल्याचे वृत्त समोर आले होते. आता त्यानंतर पश्चिमी प्रांतात लिथियमचा मोठा साठा आढळला असल्याचे इराणने म्हटले आहे. पारंपरिक इंधनाला पर्याय म्हणून जगभरात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर होऊ लागल्याने लिथियमला मागणी वाढली आहे. लिथियमला पांढरे सोने असे म्हटले जाते.    

मोबाईल फोन आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीमध्ये वापर होत असल्याने लिथियमला जगभरातून मोठी मागणी आहे. सोन्या-चांदीसारखेच लिथियमचे भाव वाढले आहेत. ज्या देशाकडे लिथियम तो देश श्रीमंत मानला जाऊ लागला आहे. पश्चिमी प्रांतातील हमीदन येथे लिथियमचा साठा आढळल्याचे इराणच्या उद्योग, गौण खनिज आणि वाणिज्य मंत्रालयाचे अधिकारी मोहम्मद हादी यांनी सांगितले आहे.

या खाणीत ८५ लाख मेट्रिक टन लिथियम असल्याचा प्राथमिक अंदाज इराण सरकारने व्यक्त केला आहे. जर इराण सरकारचा हा दावा मान्य केला तर जगातील सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचा साठा इराणकडे असल्याचे मान्य करावे लागते. अमेरिकेच्या संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार जगभरात सर्वाधिक लिथियम चिलीच्या जवळच्या खाणीत आहे. इथे ९२ लाख मेट्रिक टन लिथियम असल्याचे सांगितले जाते.

वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest