खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नूने दिली विमान उडवण्याची धमकी, १ ते १९ नोव्हेंबरची तारीख

ऑटावा : मागील आठवडाभर अनेक भारतीय विमान कंपन्यांना विमानात बॉम्ब असल्याच्या अफवांनी कोट्यवधींचा तोटा झाला आहे. गेल्या काही दिवसात तब्बल १०० हून अधिक धमक्यांचे संदेश कंपन्यांना आले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 22 Oct 2024
  • 01:53 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

ऑटावा  : मागील आठवडाभर अनेक भारतीय विमान कंपन्यांना विमानात बॉम्ब असल्याच्या अफवांनी कोट्यवधींचा तोटा झाला आहे. गेल्या काही दिवसात तब्बल १०० हून अधिक धमक्यांचे संदेश कंपन्यांना आले. परंतु सुरक्षा दलाच्या पडताळणीत काहीच आढळत नाही. या धमक्यांच्या मालिकांमुळे सतर्क झालेल्या हवाई वाहतूक विभाग, विमानतळ आणि भारतीय गुप्तचर यंत्रणांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. कारण खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नू याने भारतीय विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. त्याने यासाठी तारीखही सांगितली आहे. 

या धमकीनुसार प्रवाशांनी १ ते १९ नोव्हेंबर दरम्यान एअर इंडियाच्या विमानाने प्रवास न करण्याचा इशारा दिला. एअर इंडियाच्या विमानावर हल्ला होऊ शकतो, अशी धमकी पन्नूने दिली आहे.

दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नू या धमकीच्या संदेशामध्ये पुढे असे म्हणाला, “शीख दंगलींना ४० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त एअर इंडियाच्या विमानावर हल्ला होऊ शकतो”. यातच पुढे १ ते १९ नोव्हेंबर या तारखांनुसारच्या कालावधीचा उल्लेख आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांना धमकीवजा सल्ला दिला आहे. या दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नूची एसएफजे म्हणजेच सिख फॉर जस्टीस नावाची आहे. ही संघटना सातत्याने भारतविरोधी कारवाया करत असते. त्याबरोबरच पन्नू हा भारतविरोधी चिथावणीखोर भाषणं देत असतो. या धमकीमुळे दिवाळीसारख्या सणांसाठी मोठ्या प्रमाणावर प्रवास करणाऱ्या भारतीयांमुळे प्रवासी विमान कंपन्यांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात कोट्यवधींची उलाढाल विमान कंपन्यांमध्ये होत असते. या धमकींमुळे विशेष करून एअर इंडियासारख्या भारतीय प्रवासी कंपन्या आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर नेऊन आर्थिक दहशतवादाचा मार्गे भारताला लक्ष केले जात आहे.

गुरपतवंतसिंग पन्नूला भारत सरकारने या आधीच दहशतवादी घोषित केले आहे. त्याच्यावर फुटीरतावादाला प्रोत्साहन देणे, पंजाबमधील शीख तरुणांना भारताविरोधात शस्त्र उचलण्यास प्रवृत्त करणे, असे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, गेल्या आठवड्यात पन्नूने धमकीचा एक व्हीडीओ प्रसारित केला. त्यात त्याने भारताला ‘बाल्कनीज’ करण्याची धमकी दिली आहे. कॅनडाचे परराष्ट्र व्यवहार उपमंत्री डेव्हिड मॉरिसन यांना प्रत्युत्तर म्हणून पन्नूने हा व्हीडीओ जारी केला आहे. कारण नुकत्याच झालेल्या ओटावा येथील एका जनसुनावणीत मॉरिसन म्हणाले, “कॅनडाचे धोरण अगदी स्पष्ट आहे, भारताच्या प्रादेशिक अखंडतेचा आदर केला पाहिजे.” मॉरिसन यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर म्हणून गुरपतवंतसिंग नवा व्हीडीओ जारी केला आहे. वृत्तसंंस्था

काय आहे बाल्कनायझेशनचा अर्थ
ही संकल्पना प्रथम विसाव्या शतकात बाल्कन युद्धाच्या दरम्यान (१९१२-१३) मध्ये वापरण्यात आली. यात एका अखंड प्रदेशाचे धर्म, संस्कृती वंशाच्या अधारावर छोटे छोटे तुकडे केले जातात.

नेमके काय आहे या धमकीच्या व्हीडीओत ?
‘मिशन ऑफ एसएफजे २०२४ : वन इंडिया, टू २०४७’ या शीर्षकासह एक व्हीडीओ जारी केला आहे. याद्वारे त्याने जम्मू आणि काश्मीरसह आसाम, मणिपूर व नागालँडसारख्या देशाच्या विविध भागांत फुटीरतावादी चळवळींना प्रोत्साहन देण्याची धमकी दिली आहे. पन्नू हा एसएफजे (सिख फॉर जस्टीस) या  संघटनेचा प्रवक्ता आहे. कॅनडा आणि अमेरिकेचे दुहेरी नागरिकत्व  असलेल्या पन्नूने भारताचे बाल्कनायजेशन करण्याची धमकी दिली, तसेच चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना अरुणाचल प्रदेश परत घेण्याची विनंती केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest