इराणच्या गुप्तचर विभागात मोसादचे हेर; विशेष कार्यगटाच्या खबरा पोहोचायच्या इस्राएलपर्यंत

इस्राएलच्या मोसाद या गुप्तचर विभागाच्या विरोधात लढण्यासाठी इराणने जो कार्यगट बनवला होता, त्या कार्यगटात मोसादचा गुप्तहेर काम करत होता, त्यामुळे अंमलबजावणीपूर्वीच इराणच्या धोरणात्मक खबरा इस्राएलपर्यंत पोहोचायच्या, असा गौप्यस्फोट इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदीनेजाद यांनी केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Edited By Admin
  • Wed, 2 Oct 2024
  • 07:04 pm
Mossad intelligence,Mahmoud Ahmadinejad,spy,intelligence department,

File Photo

इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष अहमदीनेजाद यांचा गौप्यस्फोट

तेहरान : इस्राएलच्या मोसाद या गुप्तचर विभागाच्या विरोधात लढण्यासाठी इराणने जो कार्यगट बनवला होता, त्या कार्यगटात मोसादचा गुप्तहेर काम करत होता, त्यामुळे अंमलबजावणीपूर्वीच इराणच्या धोरणात्मक खबरा इस्राएलपर्यंत पोहोचायच्या, असा गौप्यस्फोट इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदीनेजाद यांनी केला आहे. अहमदीनेजाद म्हणाले की, २०२१ साली इस्राएलच्या गुप्तहेर विभागाच्या विरोधात लढण्यासाठी जो कार्यगट इराणने स्थापन केला होता, त्यामध्ये बहुसंख्य सदस्य इस्राएलचेच काम करत होते.

अहमदीनेजाद म्हणाले, इस्राएलने इराणमध्ये आपले जाळे खोलवर पसरवले होते. त्यांना सर्व काही माहिती अतिशय सहज मिळत होती. इराणमध्ये मोसादविरोधात लढण्यासाठी जो गुप्तवार्ता विभाग तयार केला होता, त्याचा प्रमुखच इस्राएलचा एजंट होता. याबद्दल आजही इराणचे प्रमुख लोक काहीही बोलण्यास तयार नाहीत.

फक्त गुप्तवार्ता विभागाचा प्रमुखच नाही तर इराणच्या संपूर्ण गुप्तहेर खात्यामध्येच इस्राएलचे २० एजंट काम करत होते, असेही अहमदीनेजाद यांनी सांगितले. एवढेच नाही तर इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाची इत्थंभूत माहिती इस्राएलला मिळाली होती. तसेच २०१८ साली इराणच्या अण्वस्त्र

कार्यक्रमाचे दस्तऐवजही चोरण्यात आले होते आणि काही इराणी शास्त्रज्ञांची हत्या करण्यात आली होती.

नुकतेच इराणमध्ये हिजबुल्लाहचा प्रमुख नेता हसन नसरल्लाहचा इस्राएलच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. बेरुतमधील मुख्यालयात हसन नसरल्लाह आहे, याबाबतची माहिती इराणी गुप्तहेरांकडून इस्राएलला देण्यात आली होती, अशी माहिती बाहेर आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

अहमदीनेजाद यांच्या आरोपानंतर आता विद्यमान राज्यकर्त्यांविरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. गुप्तचर विभागाचे माजी मंत्री अली युनीसी यांनीही दावा केला की, इराण हा इस्लामिक देश असूनही इस्राएलने त्यांची अनेक माणसे विविध विभागात पेरली आहेत. युनीसी यांनी २०२१ साली एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले होते की, मागच्या १० वर्षात मोसादने अनेक विभागात शिरकाव केला आहे. त्यामुळे इराणच्या सरकारी विभागातील अधिकाऱ्यांना आता त्यांच्या जिवाची भीती वाटत आहे.

२३ सप्टेंबरपासून इस्राएलने हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर जोरदार हवाई हल्ले चढवण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळे ९६० लोकांचा मृत्यू झाला असून जवळपास २,७७० लोक जखमी झाले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest