File Photo
#बीजिंग
feedback@civicmirror.in
कधी कोणाचे भाग्य उजळेल हे कोणीही सांगू शकत नाही. याबाबत कधीकधी आपल्या कानावर अशा काही गोष्टी ऐकू येतात त्यावर आपला विश्वास बसत नाही. चीनमध्ये अशीच एक घटना घडली असून यात एकजण रातोरात २८ कोटींचा मालक बनला आहे. विशेष म्हणजे एवढी रक्कम अनपेक्षित मिळाल्याने त्याचे समाज मदतीचे भान काही सुटले नाही. आपल्याला मिळालेल्या रकमेतील ११ कोटी त्याने दान केले आहेत.
रात्रीत ज्याचे भविष्य उजळले ती व्यक्ती म्हणजे मध्य चीनमधील हेफेईतील चँग चौ लाय. तो अनेक वर्षांपासून लॉटरीचे तिकीट खरेदी करायचा. आतापर्यंत कधीच त्याला लॉटरी लागली नाही. तरीही त्याचा आपल्या बदलणाऱ्या नशिबावर भरवसा असल्याने त्याने लॉटरी तिकिट घ्यावयाचे काही बंद केले नाही. १० सप्टेंबर २०२४ रोजी डबल कलर बॉल नावाच्या लॉटरी संस्थेने प्रथम विजेत्याची घोषणा केली. या घोषणेनंतर चँगच्या घरात आनंदोत्सव साजरा झाला. त्यानंतर त्याचे आयुष्यच बदलले. त्याच्या भावना बदलल्या आणि त्याची आर्थिक परिस्थितीही बदलली.
लॉटरी जिंकलेल्या चँगने सांगितले की, ‘मी गेल्या १० वर्षांपेक्षा अधिक काळापासून लॉटरीचे तिकीट खरेदी करत असे. या काळात आपण कधीच लॉटरीवर २५० रुपयांपेक्षा जास्त खर्च केला नाही. तसेच मी कधीतरी लॉटरी जिंकेन, असेही माझ्या डोक्यात कधी आले ठेवले नाही. मात्र, मला लॉटरी लागावी अशी अपेक्षा होती. मी फक्त एक ग्राहक म्हणून लॉटरीचे तिकीट खरेदी करत होतो. जिंकलो ती एक वेगळी गोष्ट आहे.’
पुढे तो म्हणाला की, जेव्हा मी पहिल्यांदा लॉटरी खेळायला सुरुवात केली, तेव्हा आवडीचे नंबर निवडायचा. मात्र, काही दिवसांनी एका लॉटरी विजेत्या व्यक्तीची कथा वाचली, जो कुटुंबातील सदस्यांच्या वाढदिवसाशी संबंधित लॉटरीचे तिकीट निवडायचा. यानंतर या व्यक्तीनेही अशाच पद्धतीने लॉटरीचे तिकीट खरेदी करण्याचे ठरवले. काही दिवसांपूर्वी त्याने ११९ रुपयांचे तिकीट खरेदी केले. या तिकिटामुळे मी रात्रीत २८ कोटींचा मालक बनलो. यातील ११ कोटी रुपये मी समाजातील गरजूंच्या मदतीसाठी दान केले आहेत. वृत्तसंंस्था