थायलंडमध्ये टायर फुटल्याने स्कूलबसला लागली आग; २५ विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू

थायलंडमध्ये ४४ विद्यार्थ्यांना वाहून नेणाऱ्या बसने पेट घेतल्यामुळे संपूर्ण बस जळून खाक झाली. यामध्ये २५ विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यापेक्षाही अधिक मृत्यू झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Edited By Admin
  • Wed, 2 Oct 2024
  • 06:58 pm

बसने पेट घेतल्यामुळे संपूर्ण बस जळून खाक झाली

सहलीला गेलेल्यांचा करुण अंत

बँकॉक: थायलंडमध्ये ४४ विद्यार्थ्यांना वाहून नेणाऱ्या बसने पेट घेतल्यामुळे संपूर्ण बस जळून खाक झाली. यामध्ये २५ विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यापेक्षाही अधिक मृत्यू झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. थायलंडच्या खु खॉट शहराजवळ असलेल्या झीर रंग्सीत मॉलनजीक मार्गावर सदर बसला अचानक आग लागली. भारतीय वेळेनुसार दुपारी १२.३० वाजता ही घटना घडल्याचे समोर येत आहे.

बसचा टायर फुटला आणि त्यानंतर बस दुभाजकाला जाऊन धडकली. त्यानंतर बसला आग लागल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बँकॉकमधील उथाई थानी येथील एका शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक या बसमधून सहलीसाठी जात होते.

शाळेपासून २५० किमी अंतरावरील राजधानी बँकॉकमध्ये ही सहल जात असल्याचे सांगितले जात आहे. बसला आग लागल्याने अनेक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट यामध्ये दिसत आहेत. विद्यार्थ्यांचे वय आणि या घटनेसंबंधीची इतर माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ बचाव कार्य हाती घेण्यात आले. मात्र पोलिसांनी अद्याप मृतांचा निश्चित आकडा दिलेला नाही. १६ विद्यार्थी आणि तीन शिक्षकांना आतापर्यंत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. परिवहनमंत्री सूर्या जुआंगरूंगरुंगकित म्हणाले की, अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

परंतु पोलिसांचा तपास सुरू आहे. थायलंडचे पंतप्रधान पाइतोंग्तार्न शिनावात्रा यांनी मृतांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो, असे सांगितले आहे. थायलंडचे गृहमंत्री अनुतिन चर्नविराकुल यांनी सांगितले की, बचाव पथक जेव्हा बसजवळ पोहोचले तेव्हा बसमधून आगीचे लोळ उठले होते. बसच्या आत जाणेही कठीण होऊन बसले होते. यामुळे बसमध्ये बराच काळ अनेकांचे शव जळून खाक झाले होते. ज्यांचा मृत्यू झाला, त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest