संग्रहित छायाचित्र
वॉशिंग्टन : इस्राएल इराणवर हल्ला करणार असल्याची कागदपत्र अमेरिकेकडून लीक झाल्याचे धक्कादायक वृत्त पुढे आले आहे. या कागदपत्रांचा स्रोत अमेरिकन अधिकाऱ्याचा आहे. या लीक झालेल्या इस्राएलची इराणवर हल्ला करण्याची योजना असल्याचे समजते. या कागदपत्रांवर १५ व १६ ऑक्टोबरच्या तारखा नमूद आहेत. ही कागदपत्रे 'मिडल ईस्ट स्पेक्टेटर' नावाच्या वाहिनीने १८ ऑक्टोबर रोजी टेलिग्रामवर कागदपत्रे पोस्ट केली आहेत.
वॉशिंग्टन प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेनेही या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. ही कागदपत्रे हॅक करण्यात आली आहेत की कोणीतरी जाणूनबुजून लीक केली आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. इराणकडून हॅकिंगच्या प्रयत्नांबाबत अमेरिका आधीच सतर्क आहे. यापूर्वी, अमेरिकन गुप्तचर संस्थांनी ऑगस्टमध्ये अहवाल दिला होता की, इराणने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराशी संबंधित कागदपत्रे हॅक केली होती.
माध्यम प्रतिनिधी सीएनएनने म्हटले आहे की, अशी कागदपत्रे लीक होणे ही अमेरिकेसाठी चिंतेची बाब आहे. या कागदपत्रांवर टॉप सिक्रेट असे लिहिलेले आहे. त्याबरोबरच हे दस्तऐवज केवळ अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड आणि ब्रिटनसारख्या सहयोगी देशांसाठी असल्याचेही सांगण्यात आले. कारण हे सर्व देश फाईव्ह आईज या गुप्तचर साखळीचा भाग आहेत.
इराणने १ ऑक्टोबर रोजी इस्राएलवर १८० क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता. त्यानंतर इस्राएलने गाझा पट्टीमध्ये मोठे हल्ले करून मोठी जीवितहानी केली आहे. त्याबरोबरच हे युद्ध शेजारील देश लेबनॉनमध्येदेखील पसरले आहे. प्रत्युत्तर देण्याचे बोलले होते. आजपर्यंत हजारो मुले, महिला आणि न लढणाऱ्या नागरिकांना इस्राएलने लक्ष केले आहे. त्यांनी दवाखाने, शाळादेखील हल्ल्याच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत.
अमेरिकेचे माजी उप परराष्ट्रमंत्री मिक मुलरॉय यांच्या म्हणण्यानुसार या कृतीमुळे अमेरिका-इस्राएल संबंधांवर वाईट परिणाम होऊ शकतो. कारण याचाच दुसरा अर्थ हा नियमांचे गंभीर उल्लंघन असाच घेतला जातो. दोन्ही देशांमध्ये विश्वास हा प्रमुख संबंधांचा आधार असतो. त्यामुळे या कृतीमुळे भविष्यात अमेरिका आणि इस्राएल यांच्यातील संबंध बिघडू शकतात.
मागील वर्षीदेखील अशीच काही कागदपत्रे लीक झाल्यामुळे अमेरिका आणि दक्षिण कोरिया आणि युक्रेनसारख्या मित्र राष्ट्रांमध्ये तणाव निर्माण झाला होता. ही कागदपत्रे २१ वर्षांच्या नॅशनल एअर गार्ड्समनने सोशल मीडियावर पोस्ट केली होती.
हल्ल्यासाठी शस्त्रांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक
या कागदपत्रानुसार इस्राएलची इराणवर मोठा हल्ला करण्याची योजन करीत आहे. या कागदपत्रांच्या हवाल्यानुसार इस्राएलने हल्ल्यासाठी शस्त्रास्त्रांची वाहतूक सुरू केली आहे. हा दस्तऐवज इस्राएलच्या नॅशनल जिओस्पेशियल इंटेलिजन्स एजन्सीने तयार केला आहे.
याच कागदपत्रानुसार इस्राएली हवाई दलाच्या सरावांची माहिती आहे. ज्यामध्ये हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्यांची माहिती आहे. सीएनएन या वृत्तानुसार, हा सराव आणि शस्त्रांची वाहतूक हा इराणवरील हल्ल्याच्या तयारीचा एक भाग असल्याचे सांगितले जात आहे. पेंटागॉनच्या गुप्त दस्तऐवजांपर्यंत कोणते गट प्रयत्न करीत होते चौकशी केली जात आहे.