यात खेकड्यांनी धावत्या मेट्रोत धमाल उडवून दिल्याचे दिसत आहे
न्यूयॉर्क : मेट्रो प्रवास करतांना अनेक गोष्टी घडत असतात. मेट्रोमध्ये कुणी डान्स करतानाचे व्हीडीओ व्हायरल झाले आहेत तर काहींचे भांडणाचे व्हीडीओ व्हायरल झाले आहेत. सध्या अमेरिकेतील मेट्रोचा एक व्हीडीओ सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे. यावर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात खेकड्यांनी धावत्या मेट्रोत धमाल उडवून दिल्याचे दिसत आहे.
अमेरिकेच्या सबवे मेट्रो ट्रेनमध्ये एका महिलेच्या बॅगमधून जिवंत खेकडे बाहेर आल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. मेट्रोतील काही प्रवाशांनी या घटनेचा व्हीडीओ काढला असून तो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. अमेरिकेच्या सबवे ट्रेनमध्ये नागरिक प्रवास करत होते. यावेळी मेट्रोमध्ये एका महिलेच्या बॅगमधून मोठ्या प्रमाणात अचानक खेकडे बाहेर आले.
अचानक मेट्रोत खेकडे दिसू लागल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. काही प्रवासी घाबरले. व्हायरल व्हीडीओमध्ये एका महिलेची प्लॅस्टिकची पिशवी तुटून हे खेकडे बाहेर आल्याचे निष्पन्न झाले. काही नागरिक खेकडे पाहून घाबरले तर काहींनी हाताने हे खेकडे पकडून पुन्हा पिशवीत भरले. हा व्हीडीओ एकाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून 'न्यूयॉर्क मेट्रोशी संबंधित मजेशीर गोष्टी' असे त्याने टायटल दिले आहे. हा व्हीडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यावर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत.
प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोच्या डब्यातील बॅगमधून अचानक खेकडे बाहेर पडू लागल्यावर नागरिक हैराण झालेले दिसत आहेत. ज्या महिलेच्या बॅगेतून हे खेकडे बाहेर आले त्या महिलेने देखील तिच्या सीटवरून उडी मारून दाराच्या दिशेने पळताना दिसत आहे. जवळच उभा असलेला एक माणूस तिला मदत करण्याचा प्रयत्न करत होता. पण पिशवीतून आणखी खेकडे पडल्याने त्यालाही धक्का बसला. त्यानंतर अनेक प्रवासी महिलेच्या मदतीसाठी पुढे आले.
त्यांनी खेकडे पकडून बॅगेत भरण्यासाठी प्रयत्न सुरू केले. काहींनी महिलेला दुसरी बॅग दिली. महिलेने फटलेल्या पिशवीत खेकडे ठेवण्याचा प्रयत्न केला पण आणखी खेकडे बाहेर पडू लागले. दोन प्रवाशांनी कसेबसे खेकडे उचलून दुसऱ्या पिशवीत ठेवले.
लाखो नेटकऱ्यांनी पाहिला व्हीडीओ
हा व्हीडीओ २० लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. यावर नेटकरी मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, मला खेकड्यांबद्दल वाईट वाटते. आणखी एका यूजरने लिहिले की, 'स्नेक ऑन अ प्लेन फिल्म, क्रॅब्स ऑन अ ट्रेनचा हा दुसरा भाग आहे. आणखी एका यूजरने लिहिले की, कल्पना करा की तुम्ही पहिल्यांदाच बाहेर पडता आणि स्वतःला ट्रेनमध्ये शोधता. हे ऐतिहासिक खेकडे आहेत कारण त्यांनी भुयारी मेट्रो पाहिली आहे. काही नेटकरी या महिलेला मदत केल्याबद्दल प्रवाशांचे कौतुकही करत आहेत.