अमेरिकेचे खासदार मायकेल बेनेट यांचा सोशल मीडियावरील कंपन्यांना प्रश्न

भारतातील लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून आचारसंहिताही लागू झाली आहे.

अमेरिकेचे खासदार मायकेल बेनेट यांचा सोशल मीडियावरील कंपन्यांना प्रश्न

 #वॉशिंग्टन 

भारतातील लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून आचारसंहिताही लागू झाली आहे. निवडणुकीत सोशल मीडिया महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने फेक न्यूज रोखण्यासाठी कंपन्यांनी काय तयारी केली आहे, असा प्रश्न अमेरिकन खासदार मायकेल बेनेट यांनी उपस्थित केला आहे. मेटा-मालकीच्या व्हॉट्स अपवर अफवा, चुकीची माहिती पसरवण्याचा मोठा इतिहास आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.

अमेरिकेतील निवडणुकांवर लक्ष ठेवणाऱ्या सिनेट इंटेलिजन्स अँड रुल्स कमिटीचे सदस्य असलेले बेनेट हे सोशल मीडिया कंपन्यांना लिहलेल्या पत्रात म्हणतात की, तुमच्या प्लॅटफॉर्मवर निवडणुकीसाठी निर्माण होणारे धोके काही नवीन नाहीत. वापरकर्त्यांनी मागील काळात डीपफेक, छेडछाड केलेला मजकूर मोठ्या प्रमाणावर शेअर केला होता. आता, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) लोकशाही प्रक्रिया आणि राजकीय स्थिरतेची जोखीम वाढवणार आहे. अत्याधुनिक एआयमुळे कोणालाही सहजपणे खोटी छायाचित्रे, प्रतिमा, व्हीडीओ आणि ऑडिओ तयार करणे सोपे झाले आहे. यावर्षी ७० हून अधिक देशांमध्ये निवडणुका होत आहेत. 

यासाठी दोन अब्जांहून अधिक लोक मतदान करणार आहेत. निवडणूक होत असलेल्या देशांमध्ये भारत, अमेरिका,ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, क्रोएशिया, फिनलंड, घाना, आइसलँड, लिथुआनिया, नामिबिया, मेक्सिको, मोल्दोव्हा, मंगोलिया, पनामा, रोमानिया, सेनेगल, दक्षिण आफ्रिका, ब्रिटनचा समावेश आहे. बेनेट यांनी एक्सचे एलोन मस्क, मेटाचे मार्क झुकरबर्ग, टिकटॉकचे शॉ जी च्यु आणि अल्फाबेटचे सुंदर पिचाई यांना पत्रे लिहिली आहेत. त्यांनी या सोशल मीडिया कंपन्यांना निवडणूक धोरणे, मजकूर नियंत्रण पथकासह  एआयच्या साधनांची ओळख पटवण्यासाठी वापरत असलेल्या साधनांबाबत माहिती देण्याची विनंती केली 

आहे.  वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest