युक्रेनला लोकांच्या भावना दुखावण्याची सवय
#मॉस्को
कालीमातेच्या अवमान करणारे छायाचित्र ट्विट केल्याबद्दल युक्रेनने भारताची जाहीर माफी मागितली आहे. मात्र आता या वादात रशियाने उडी घेतली असून युक्रेन सरकारला लोकांच्या भावनांची कदर करायची सवय नाही, धार्मिक भावना दुखावणे ही त्यांची उपजत प्रवृत्ती असल्याचे खडेबोल रशियाने सुनावले आहेत.
भारतात युक्रेनची चरचा सुरु झाली ती युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने केलेल्या ट्विटमुळे.रशियाशी युद्ध करण्यात व्यस्त युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने एका ट्विटमध्ये भारतीयांचे आराध्य दैवत असलेल्या कालीमातेचे छायाचित्र चुकीच्या पद्धतीने सादर केले. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने कालीमातेचा एक आक्षेपार्ह फोटो शेअर केला आहे. तसेच हे ट्वीट ‘हिंदूफोबिक’ असल्याचा आरोप युवकांनी केला. त्यावर युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी तत्काळ भारताची माफी मागितली आहे. दरम्यान, आता भारतीयांच्या भावना दुखावल्याबद्दल रशियाने युक्रेनवर तोंडसुख घेतले आहे. रशियाने युक्रेनच्या या कृत्याचा निषेध केला आहे. तसेच युक्रेनची तुलना नाझीवादाशी केली आहे.
संयुक्त राष्ट्रात रशियाचे प्रतिनिधी दिमित्री पोलिन्स्की म्हणाले की, युक्रेन सरकार कोणाच्याही आस्थेची परवा करत नाही, मग तो हिंदू असो, मुस्लीम असो अथवा ख्रिश्चन ऑर्थोडॉक्स असो. युक्रेनचे सैनिक कुराण जाळत आहेत, काली मातेचा अवमान करत आहेत. त्याचवेळी ऑर्थोडॉक्स ख्रिश्चनांची पवित्र स्थळे नष्ट करत आहेत. ते केवळ नाझी विचारसरणीचे अनुकरण करतात. त्यांच्यासाठी युक्रेन सर्वश्रेष्ठ असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
वृत्तसंस्था