क्रीडास्पर्धेवेळी कॅन्ससमध्ये झालेल्या गोळीबारात दोन ठार, २२ जण जखमी
या घटनेत आठ मुलांसह अन्य २२ जण जखमी झाल्याची माहिती आहे. गोळीबाराची ही घटना ‘सिटी चीफ्स सुपर बाउल’ या क्रीडा स्पर्धेदरम्यान घडली.
कॅन्सस शहराचे पोलीस प्रमुख स्टेसी ग्रेव्हज यांनी सांगितलं की, या दुर्घटनेनंतर तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. येथे क्रीडा स्पर्धेदरम्यान सहभागी असलेल्या काही लोकांनी संशयिताला अटक करण्यात मदत केल्याची माहितीही दिली.
ग्रेव्हज पुढे म्हणाले की, आज जे काही घडलं, त्यामुळं मी खूप दु:खी झालो आहे. येथे आलेल्या लोकांना किमान सुरक्षित वातावरणाची अपेक्षा होती. मात्र, तसं घडलं नाही. दरम्यान, पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची कोणतीही माहिती तत्काळ जाहीर केली नाही. या गोळीबारामागचा हेतू काय होता हेही पोलिसांनी सांगितलेलं नाही. याआधी गेल्या वर्षी डेन्व्हर शहरात एमबीए चॅम्पियनशिपमध्येही गोळीबार झाला होता. त्यातही अनेक लोक जखमी झाले होते. काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्कच्या सबवे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरही गोळीबार झाला होता.