ट्विटरने बंद केली भारतातील ६ लाख खाती

एलॉन मस्क यांनी ट्विटरची खरेदी केल्यापासून कंपनीमध्ये सातत्याने काही बदल करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली ट्विटरने २६ जानेवारी २०२३ ते २५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतातील ६,८२,४२० खाती बंद केली आहेत. या खात्यांवरून बाल लैंगिक शोषण आणि जबरदस्तीने अश्लीलतेला प्रोत्साहन दिल्याचे कारण ट्विटरने दिले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 4 Apr 2023
  • 01:47 am
ट्विटरने बंद केली भारतातील ६ लाख खाती

ट्विटरने बंद केली भारतातील ६ लाख खाती

#न्यूयॉर्क

एलॉन मस्क यांनी ट्विटरची खरेदी केल्यापासून कंपनीमध्ये सातत्याने काही बदल करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली ट्विटरने २६ जानेवारी २०२३ ते २५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतातील ६,८२,४२० खाती बंद केली आहेत. या खात्यांवरून बाल लैंगिक शोषण आणि जबरदस्तीने अश्लीलतेला प्रोत्साहन दिल्याचे कारण ट्विटरने दिले आहे.

दहशतवादाला प्रोत्साहन देणारी १,५४८ खाती ट्विटरने बंद केली आहेत. ट्विटरने नवीन माहिती-तंत्रज्ञान नियम २०२१ चे पालन करताना आपल्या मासिक अहवालामध्ये सांगितले की, तक्रार निवारण यंत्रणेद्वारे भारतातील वापरकर्त्यांकडून त्यांना ७३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीनुसार, २७ खात्यांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. तपशिलाचा आढावा घेतल्यानंतर आम्ही यापैकी १० खात्यांवरील निलंबन मागे घेतले आहे. बाकीची खाती बंद करण्यात आली आहेत. नव्या नियमानुसार, ५० लाखांपेक्षा जास्त वापरकर्ते असणाऱ्या सर्व डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सर्व आवश्यक माहितीचा एक अहवाल सादर करणे आवश्यक आहे. या प्लॅटफॉर्ममध्ये ट्विटर, व्हाट्स ॲप, यूट्यूब, फेसबुक आणि इतर पर्यायांचाही समावेश आहे.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तान सरकारच्या अधिकृत ट्विटर खात्यावर भारतात बंदी घालण्यात आली आहे. जेव्हा कोणी पाकिस्तान सरकारच्या ट्विटर खात्यावर जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला कायदेशीर मागणीला प्रतिसाद मिळाल्यानंतर पाकिस्तान सरकारचे ट्विटर खाते भारतात ब्लॉक करण्यात आल्याचे उत्तर दिले जाते. 

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest