न्यूझीलंडला सुनामीच्या धोका

जगभरात भूकंपाच्या घटना वाढू लागल्या आहेत. अलीकडेच तुर्की आणि सीरियात झालेल्या महाप्रलंयकारी भूकंपाने ४० हजारांहून अधिक लोकांचा बळी घेतला. तसेच काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडही भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला होता. या देशाने एका महिन्याच्या अंतराने आणखी एक भूकंप अनुभवला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Tue, 25 Apr 2023
  • 06:09 am
न्यूझीलंडला सुनामीच्या धोका

न्यूझीलंडला सुनामीच्या धोका

भूकंपाच्या ७.३ रिश्टर स्केल धक्क्यानंतर अमेरिकी यंत्रणेचा सावधगिरीचा इशारा

#वेलिंग्टन

जगभरात भूकंपाच्या घटना वाढू लागल्या आहेत. अलीकडेच तुर्की आणि सीरियात झालेल्या महाप्रलंयकारी भूकंपाने ४० हजारांहून अधिक लोकांचा बळी घेतला. तसेच काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडही भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला होता. या देशाने एका महिन्याच्या अंतराने आणखी एक भूकंप अनुभवला आहे.

सोमवारी सकाळी पुन्हा एकदा न्यूझीलंडमध्ये ७.३ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला.

भूकंपाच्या तीव्रतेची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिली आहे. अद्याप या भूकंपाने झालेल्या नुकसानाची माहिती मिळालेली नाही. या माहितीनुसार, न्यूझीलंडच्या उत्तर-पूर्वेला असलेल्या कर्माडेक बेटावर सकाळी ६ वाजून ११ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. गेल्या महिन्यात देखील न्यूझीलंड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला होता. तेव्हा येथील कर्माडेक बेटांवर ७.१ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे धक्के बसले होते. दरम्यान बिघडत चाललेले निसर्गचक्र आणि मानवप्रेरित हवामानातील असमतोल यामुळे पृथ्वीवर दिवसेंदिवस नवीन आव्हाने वाढत आहेत. तापमानात वाढ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पाऊस, पूर आणि भूकंपात वाढ होणे या बदलांची ही उदाहरणे आहेत. अलीकडील काळात तर असे बदल झाल्याचे आपण सातत्याने अनुभवत आहोत. भूकंपानंतर यूएस सुनामी वॉर्निंग सिस्टिमने (अमेरिकन त्सुनामी इशारा प्रणाली) न्यूझीलंडला त्सुनामीचा धोका वर्तवला आहे.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest