कॅनडाच्या संसदेत दहशतवादी निज्जरला श्रद्धांजली

दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती ठेवणारा कॅनडाचा खरा चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे. कॅनडाच्या संसदेने खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरसाठी दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. मागच्यावर्षी कॅनडामध्ये त्याची हत्या करण्यात आली होती. याआधी कॅनडाने एका नाझी सैनिकाला सन्मानित केले होते. हरदीप सिंह निज्जरच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झाले. म्हणून कॅनडाच्या संसदेने मौन पाळून त्याला श्रद्धांजली वाहिली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Thu, 20 Jun 2024
  • 03:56 pm
world news

संग्रहित छायाचित्र

कॅनडा सरकारचा खरा चेहरा पुन्हा एकदा उघड, दहशतवादी निज्जरच्या हत्येला एक वर्ष

ओट्टावा: दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती ठेवणारा कॅनडाचा खरा चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे. कॅनडाच्या संसदेने खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरसाठी दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. मागच्यावर्षी कॅनडामध्ये त्याची हत्या करण्यात आली होती. याआधी कॅनडाने एका नाझी सैनिकाला सन्मानित केले होते. हरदीप सिंह निज्जरच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झाले. म्हणून कॅनडाच्या संसदेने मौन पाळून त्याला श्रद्धांजली वाहिली.

येत्या २३ जूनला कनिष्क विमान दुर्घटनेला ४० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच दरम्यान कॅनडाच्या संसदेने ही लज्जास्पद कृती केली आहे. भारताने हरदीप सिंह निज्जरला दहशतवादी घोषित केले होते. खालिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची मागच्यावर्षी १८ जूनला एका गुरुद्वाराच्या पार्किंगमध्ये हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. हरदीप सिंह निज्जर कॅनडाच्या वँकूवर शहरातील गुरु नानक शीख गुरुद्वाराचा अध्यक्ष होता. हरदीप सिंह निज्जर खलिस्तान आंदोलनाशी जोडलेला भारतीय वंशाचा कॅनेडीयन शिख फुटीरतवादी नेता होता. भारत सरकारकडून त्याला दहशतवादी घोषित करण्यात आले होते. खालिस्तान टायगर फोर्स या दहशतवादी संघटनेशी तो संबंधित होता.

फुटीरतावादी हरदीप सिंह निज्जरचा पंजाबच्या जालंधरमधील भार सिंह पुरा गावात जन्म झाला. १९९०च्या दशकात निज्जर कॅनडात रहायला गेला. तिथूनच तो भारतविरोधी कारवायाच करायचा. निज्जर खालिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख होता. खलिस्तान टायगर फोर्सच्या सदस्यांना मदत, नेटवर्किंग, ट्रेनिंग आणि आर्थिक मदत करायचा. या संघटनेने नेहमीच स्वतंत्र खलिस्तानची मागणी केली आहे. निज्जरने स्वतंत्र खलिस्तानसाठी 'सिख रेफरेंडम २०२०' म्हणून ऑनलाइन अभियान चालवले होते.  एका प्रकरणात २०२० साली त्याची पंजाबमध्ये संपत्ती जप्त करण्यात आली. तो 'शीख फॉर जस्टिस'शी सुद्धा संबंधित होता.

कॅनडाने नेहमीच भारतविरोधी आणि फुटीरतावादी नेत्यांचे समर्थन केलेले आहे. मागच्यावर्षी सप्टेंबरमध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारताचा दौरा केला होता. ते इथे जी-२० शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी आले होते. भारताचा दौरा केल्यानंतर १८ सप्टेंबरला त्यांनी कॅनडाच्या संसदेत वक्तव्य केले होते.  निज्जरच्या हत्येमध्ये भारत सरकार सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

निज्जर प्रकरणात आतापर्यंत ४ आरोपींना अटक
गेल्या महिन्यातच कॅनडाने ४ भारतीय नागरिकांना निज्जर हत्येप्रकरणी अटक केली होती. एडमंटन येथील करण ब्रार (२२), कमलप्रीत सिंग (२२) आणि करणप्रीत सिंग (२८) यांच्यावर फर्स्ट डिग्री खून आणि हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. यानंतर आणखी एका भारतीय अमनदीप सिंगला काही दिवसांनी कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest