Zelensky : झेलेन्स्कींना ठार मारण्याशिवाय पर्याय उरला नाही

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्या निवासस्थानावर करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणावात वाढ झाली आहे. या संदर्भात दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे केले जात आहेत. रशियाने असा हल्ला झाल्याचा दावा केला असून त्या संदर्भातला एक व्हीडीओ सध्या व्हायरल होत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 5 May 2023
  • 03:23 pm
झेलेन्स्कींना ठार मारण्याशिवाय पर्याय उरला नाही

झेलेन्स्कींना ठार मारण्याशिवाय पर्याय उरला नाही

व्लादिमिर पुतीन यांच्या निवासस्थानावरील ड्रोन हल्ल्यानंतर रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी दिली धमकी; ड्रोन हल्ल्यानंतर तणावात वाढ

#मॉस्को

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्या निवासस्थानावर करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणावात वाढ झाली आहे. या संदर्भात दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे केले जात आहेत. रशियाने असा हल्ला झाल्याचा दावा केला असून त्या संदर्भातला एक व्हीडीओ सध्या व्हायरल होत आहे. दुसरीकडे युक्रेनकडून या हल्ल्याशी कोणताही संबंध नसल्याचा दावा युक्रेनने केला आहे. मात्र या ड्रोन हल्ल्यामुळे आता रशियाने थेट युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना संपवण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणाव वाढण्याची शक्यता आहे.

बुधवारी (३ मे) रशियाने राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्या क्रेमलिन येथील निवासस्थानावर ड्रोन हल्ला झाल्याचा दावा केला. याचा एक व्हीडीओही सोशल मीडियावर लागलीच व्हायरल झाला. हा हल्ला युक्रेनने केल्याचा दावा रशियाने केला आहे. या पार्श्वभूमीवर युक्रेनने या हल्ल्याशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, रशियन सरकार आपल्या भूमिकेवर ठाम असून थेट अण्वस्त्र  हल्ल्याची भीती रशियाकडून घालण्यात येत आहे. दरम्यान हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. याबाबत राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन योग्य तो निर्णय घेतील. इथून पुढे काहीही होऊ शकते. खरे तर हे थेट युद्ध नाही. आम्ही युक्रेनमध्ये विशेष लष्करी मोहीम राबवतो आहे. आमच्याकडे खूप अणवस्त्र देखील आहेत, याचा विचार युक्रेनने करायला हवा, अशा शब्दांत रशियातील भारतीय वंशाचे खासदार अभय कुमार सिंग यांनी युक्रेनला गंभीर इशारा दिला आहे.

रशियाची खुली धमकी!

युक्रेनने हल्ल्याशी संबंध नसल्याचे स्पष्ट केल्यानंतरही रशियन नेत्यांचा पारा खाली उतरलेला नाही. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनाच संपवण्याची भाषा रशियाकडून केली जात आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर आता झेलेन्स्की आणि त्यांच्या सहकाऱ्यांना संपवण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. आता झेलेन्स्कींना बिनशर्त शरणागती पत्करण्याच्या करारपत्रावर सही करण्याचीही गरज नसल्याचे रशियाचे माजी अध्यक्ष आणि रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव म्हणाले आहेत. सगळ्यांनाच माहिती आहे की हिटलरनेही अशा प्रकारच्या कोणत्याही करारपत्रावर सही केली नव्हती. अशा प्रकारची माणसे कायम दिसून येतात, असेही मेदवेदेव यांनी नमूद केले आहे.

क्रेमलिनवर हल्ला करण्याएवढी तयारी नाही

पुतीन यांच्यावर हल्ला करण्याएवढी शस्त्रास्त्रे आमच्याकडे नाहीत. आम्ही युद्ध करत नाही तर केवळ आमची शहरे आणि गाव वाचवत आहोत. आम्हाला रशियाचा भूभाग जिंकायचा नाही तर स्वतःचा भूभाग वाचवायचा आहे. थेट पुतीन यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्याएवढी आमची तयारी तरी आहे का? अशा शब्दांत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. पुतीन यांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ला झाला त्यावेळी ते फिनलँड दौऱ्यावर होते.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest