‘भारत-पाकिस्तानमध्ये थेट द्विपक्षीय चर्चा व्हावी’

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत प्रत्यक्ष द्विपक्षीय चर्चा' व्हायला हवी, असे मत अमेरिकेने व्यक्त केले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानमधील चर्चेची व्याप्ती, गती आणि वैशिष्ट्य आमच्या नव्हे तर त्या देशांच्या अटींवर असावी अशी आमची इच्छा आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Sat, 22 Jun 2024
  • 11:50 am
world news, bilateral talks between India and Pakistan'

संग्रहित छायाचित्र

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांचे निवेदन

#वॉशिंग्टन 
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत प्रत्यक्ष द्विपक्षीय चर्चा' व्हायला हवी, असे मत अमेरिकेने व्यक्त केले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानमधील चर्चेची व्याप्ती, गती आणि वैशिष्ट्य आमच्या नव्हे तर त्या देशांच्या अटींवर असावी अशी आमची इच्छा आहे.

मॅथ्यू मिलर म्हणाले की, अमेरिका दोन्ही देशांबरोबरच्या संबंधांना महत्त्व देते. प्रादेशिक पातळीवरील धोक्याचा सामना करणे हे अमेरिका, पाकिस्तान या दोन्ही देशांचे समान ध्येय आहे.

आम्ही पाकिस्तानशी सुरक्षेच्या मुद्द्यांवर उच्चस्तरीय दहशतवादविरोधी चर्चेमध्ये गुंतलो आहोत. दहशतवादाविरोधातील मोहिमेबाबत आम्ही पाकिस्तानी नेत्यांशी नियमितपणे संवाद साधत आहोत. याद्वारे आम्ही प्रादेशिक सुरक्षेबाबत भविष्यातही सविस्तर चर्चा करत राहू.परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी भारताशी व्यापार सुरू होण्याची शक्यता फेटाळून लावली होती. त्या म्हणाल्या होत्या की २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० बेकायदेशीरपणे हटवले होते. तेव्हापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतेही व्यापारी संबंध नाहीत. पाकिस्तानची भूमिका कायम आहे.

फेब्रुवारी २०२४ मध्ये, भारत सरकारच्या माहितीनुसार दोन्ही देशांमध्ये अजूनही काही व्यापार सुरू आहे. हा व्यापार सागरी मार्गाने होत आहे. पाकिस्तानने एकतर्फी सीमेवरून होणारी आयात-निर्यात बंद केली होती. पूर्वी व्यापार अटारी-वाघा बॉर्डर आणि कराची बंदरातून होत असे. आता जमिनीच्या मार्गाने व्यापार होत नाही. काही व्यापार समुद्र आणि हवाई मार्गाने होत आहे. 

कलम ३७० हटवल्याने संबंध बिघडले
भारत सरकारने २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरसाठीचे कलम ३७० हटवल्याने द्विपक्षीय संबंध आणखी बिघडले. या कलमांमुळे जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता. ते रद्द केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले होते. त्यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान होते. जोपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० ची फेरस्थापना होत नाही तोपर्यंत भारतासोबत कोणतीही चर्चा होणार नाही, असे त्यांनी जाहीर केले होते. त्यावेळी भारताने अशी भूमिका घेतली होती की, जोपर्यंत दहशतवाद्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत चर्चेचा प्रश्नच उद्भवत नाही. तेव्हापासून चार वर्षे ५ ऑगस्ट रोजी पाकिस्तान भारताविरोधात देशभर निदर्शने करत असते.

संबंध सुधारण्याची इच्छा
अलीकडच्या काही महिन्यांत पाकिस्तानने भारतासोबत व्यापारी संबंध पूर्ववत करण्याची इच्छा  सातत्याने व्यक्त केली आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचा व्यापार एकतर्फी बंद केला होता. एप्रिलमध्ये पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारतातील निवडणुकीनंतर दोन्ही देशांमधील संबंध सुधारू शकतील अशी आशा व्यक्त केली होती. यापूर्वी २३ मार्च रोजी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार म्हणाले होते की, पाकिस्तानचा व्यापारी समुदाय भारतासोबत व्यापार पूर्ववत करू इच्छितो. या प्रकरणाचा आढावा घेऊन सरकार निर्णय घेईल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest