नवरा दात घासत नाही म्हणून पत्नीने मागितला घटस्फोट

सामान्यत: घरगुती हिंसाचार, दुसऱ्याशी संबंध, मद्यपान आणि अमली पदार्थांचे व्यसन ही पती-पत्नीमधील घटस्फोटाची कारणे बनतात, पण तुम्ही कधी ऐकले आहे का की एका महिलेने पती गलिच्छ राहतो म्हणून घटस्फोट मागितला आहे?

Divorce

संग्रहित छायाचित्र

अस्वच्छ नवऱ्यापासून पत्नीची सुटका

सामान्यत: घरगुती हिंसाचार, दुसऱ्याशी संबंध, मद्यपान आणि अमली पदार्थांचे व्यसन ही पती-पत्नीमधील घटस्फोटाची कारणे बनतात, पण तुम्ही कधी ऐकले आहे का की एका महिलेने पती गलिच्छ राहतो म्हणून घटस्फोट मागितला आहे? हो हे खरे आहे.  तुर्कस्तानमधील (Turkey) एक महिला आपला पती स्वच्छता राखत नसल्याने वैतागली होती. सतत विरोध करूनही पतीने आपल्या सवयी सोडल्या नाहीत. दरम्यान, पतीच्या वाईट सवयींविरोधात महिलेने न्यायालयात धाव घेतली. (World News)

अंकारा (Ankara) येथील १९ व्या फॅमिली कोर्टाला महिलेने सांगितले की, तिचा पती सलग पाच दिवसांपासून एकच कपडे घालत होता आणि त्याला सतत घामाचा वास येत होता.  पतीच्या घाणेरड्या सवयीमुळे महिला नाराज होती. महिलेचा आरोप आहे की, तिचा नवरा दात घासत नाही आणि आंघोळही करत नाही. यालाच वैतागून पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी महिलेने न्यायालयात धाव घेतली. ती महिला आपल्या पतीच्या वाईट सवयींना कंटाळली होती आणि तिला घटस्फोट हवा होता. महिलेने दावा केला की, तिचा नवरा क्वचितच आंघोळ करतो, परिणामी शरीराला सतत दुर्गंधी येते आणि तो आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच दात घासतो.

महिलेच्या वकिलाने न्यायालयात साक्षीदार हजर केले. या साक्षीदारांनी महिलेचा पती वैयक्तिक स्वच्छता ठेवत नसल्याचे सांगितले. दरम्यान, महिलेच्या अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला. इतकेच नाही तर न्यायालयाने पतीला पत्नीला त्रास दिल्याबद्दल नुकसानभरपाई म्हणून ५० हजार तुर्की लिरा देण्याचे आदेश दिले.

कार्यालयातील लोकांनी दिली साक्ष

या दाव्यांना दुजोरा देण्यासाठी साक्षीदारांनाही बोलावण्यात आले होते, ज्यामध्ये त्यांच्या ओळखीचे आणि पतीच्या कार्यालयातील काही सहकाऱ्यांचाही समावेश होता. त्या सर्वांनी त्या महिलेचे म्हणणे खरे असल्याचे सांगितले. न्यायालयाने आपल्या निकालात महिलेची घटस्फोटाची विनंती मान्य केली आणि पतीला वैयक्तिक स्वच्छतेच्या अभावामुळे तेव्हाच्या पत्नीला नुकसान भरपाई म्हणून ५० हजार तुर्की लीरा ( १४ लाख डॉलर) देण्याचे आदेश दिले. संबंधित महिलेचे वकील सेनेम यिलमाजेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दाम्पत्याने एकत्रित आयुष्यात अपेक्षित जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत. एखाद्याच्या वागण्यामुळे सहजीवन असह्य झाले तर दुसऱ्या पक्षाला घटस्फोटाची याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे. मानवी संबंधांमध्ये आपण सर्वांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. यासाठी आपण आपले वर्तन आणि स्वच्छता या दोन्हीकडे लक्ष दिले पाहिजे, असे सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest