मनोरंजनविश्वात बेरोजगारीचे संकट

मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज कंपनी डिज्नी मोठ्या प्रमाणात नोकरकपात करण्याची शक्यता आहे. कंपनीने पुढील महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये चार हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक मंदीच्या भीतीने डिज्नी कंपनीने नोकरकपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 20 Mar 2023
  • 03:18 pm
मनोरंजनविश्वात बेरोजगारीचे संकट

मनोरंजनविश्वात बेरोजगारीचे संकट

डिज्नी देणार पुढच्या महिन्यात ४ हजार कामगारांना नारळ

#कॅलिफोर्निया

मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज कंपनी डिज्नी मोठ्या प्रमाणात नोकरकपात करण्याची शक्यता आहे. कंपनीने पुढील महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये चार हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक मंदीच्या भीतीने डिज्नी कंपनीने नोकरकपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीची पुनर्रचना आणि खर्च कमी करण्यासाठी डिज्नीने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले आहे.

नित्याच्या खर्चात बचत करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कंपनीने आपल्या व्यवस्थापकांना एप्रिलमध्ये करण्यात येणाऱ्या नोकरकपातीसाठी उमेदवार शॉर्टलिस्ट करण्यास सांगितले आहे. कंपनी एप्रिल महिन्यामध्ये चार हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे. मात्र, कंपनी ही चार हजार कर्मचाऱ्यांची नोकरकपात एकत्र करणार आहे की, लहान तुकड्यांमध्ये कर्मचाऱ्यांना हटवणार आहे, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कंपनी येत्या ३ एप्रिल रोजी होणाऱ्या वार्षिक बैठकीपूर्वी नियोजित नोकरकपातीची घोषणा करण्याची शक्यता आहे.

या आधी कंपनीने सुमारे सात हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली होती. जागतिक आर्थिक मंदीच्या भीतीमुळे सर्व क्षेत्रातील कंपन्यांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे जगभरातील अनेक कंपन्या नोकरकपात करत आहेत.वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest