हीलिअम गळतीमुळे रखडला परतीचा प्रवास!

मे आणि जून महिन्यांत दोनदा प्रयत्न केल्यानंतर सुनीता विल्यम्स या ५ जून रोजी अंतराळात पोहोचल्या. परंतु, त्यांचा आता परतीचा मार्ग खडतर बनला आहे. त्या अंतराळातच अडकल्या आहेत. ५ जून रोजी त्यांनी अंतराळात झेप घेतली. नियोजनानुसार त्या २२ जून रोजी परतणार होत्या. परंतु, स्टारलाईनर स्पेसक्राक्ट या अंतराळयानात बिघाड झाल्याने त्या काही दिवसांपासून अंतराळातच अडकून पडल्या आहेत. मिंटने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Wed, 26 Jun 2024
  • 12:49 pm
world news

संग्रहित छायाचित्र

गळतीबाबत माहिती असतानाही मोहीम कार्यान्वित करण्याचा निर्णय

वाॅशिंग्टन : मे आणि जून महिन्यांत दोनदा प्रयत्न केल्यानंतर सुनीता विल्यम्स या ५ जून रोजी अंतराळात पोहोचल्या. परंतु, त्यांचा आता परतीचा मार्ग खडतर बनला आहे. त्या अंतराळातच अडकल्या आहेत. ५ जून रोजी त्यांनी अंतराळात झेप घेतली. नियोजनानुसार त्या २२ जून रोजी परतणार होत्या. परंतु, स्टारलाईनर स्पेसक्राक्ट या अंतराळयानात बिघाड झाल्याने त्या काही दिवसांपासून अंतराळातच अडकून पडल्या आहेत. मिंटने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

अमेरिकी अंतराळ संस्था ‘नासा’मध्ये कार्यरत असणाऱ्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी दुसऱ्यांदा अंतराळात भरारी घेतली आहे. त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांच्यासह बोइंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातून ‘आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानका’ मध्ये ५ जून रोजी (आयएसएस) पोहोचले. परंतु, आता सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पुन्हा पृथ्वीतलावर केव्हा परतणार याबाबत नासाने कोणतीही माहिती दिलेली नाही. स्टारलाइनर या त्यांच्या यानात हीलिअम गळती झाल्याने त्यांचा परतीचा प्रवास रखडला असल्याची चर्चा आहे. हे मिशन सुरू होण्याआधीच नासा आणि बोईंग या दोघांनाही या हीलिअम गळतीबाबत माहिती होती. तरीही या गळतीकडे दुर्लक्ष करून ही मोहीम कार्यन्वित केली गेली. मोहीम सुरू होण्याआधीच ही गळती रोखली गेली होती, असा दावा करण्यात येत आहे.

दरम्यान, न्यूजवीकच्या हवाल्याने मिंटने दिलेल्या वृत्तानुसार, स्पेस स्टेशनमध्ये अंतराळयान सुरक्षित असून चांगली कामगिरी करत आहे, असे नासाने म्हटले आहे. तसेच विल्यम्स आणि विल्मोर अंतराळात अडकले नसून ते आवश्यक असेल तेव्हा नक्कीच परततील. मिशन संघांना प्रोपल्शन सिस्टम डेटाचे पुनरावलोकन करण्यासाठी आणि हीलियम गळती रोखण्याकरता वेळ देण्यासाठी ते ऑर्बिटमध्ये आहेत. अहवालानुसार, स्टारलाइनरमध्ये पुढील ४५ दिवसांचा इंधनपुरवठा आहे. आम्ही आमचा वेळ घेत आहोत आणि आमच्या मानक मिशन मॅनेजमेंट टीम प्रक्रियेचे अनुसरण करत आहोत, असे नासाचे कमर्शिअल क्रू प्रोग्राम मॅनेजर स्टीव्ह स्टिच यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, आम्ही लहान हेलियम सिस्टम लीक आणि थ्रस्टर कार्यप्रदर्शन व्यवस्थापित करण्याच्या सापेक्ष डेटाला आमचे निर्णय घेऊ देत आहोत. दरम्यान सुनीता विल्यम्स यांनी १९८७ मध्ये यूएस नेव्हल अकादमीतून पदवी घेतली. त्यानंतर त्यांची नासामध्ये अंतराळवीर म्हणून निवड झाली. त्यांचे वडील दीपक पांड्या या अहमदाबादमधून अमेरिकेत स्थायिक झाले होते. सुनीता विल्यम्स यांचा जन्म १९६५ मध्ये झाला. यूएस नेव्हल अकादमीतून पदवी घेतलेल्या सुनीता विल्यम्स यांनी लढाऊ विमानंही उडवली आहेत. त्यांनी ३० प्रकारच्या लढाऊ विमानांवर तीन हजार तासांपेक्षा अधिक उड्डाणांचा अनुभव आहे. सुनीता विल्यम्स यांनी मायकेल विल्यम्स यांच्याशी लग्न केले.  मायकेल हे टेक्सासमध्ये पोलीस अधिकारी होते. सुनीता विल्यम्स यांनी २००६ आणि २०१२ मध्ये त्यांनी अंतराळात प्रवास केला होता. या दोनही मोहिमांमध्ये एकूण ३२२ दिवस त्यांनी अंतराळात घालवले होते. हा विक्रम मानला जात आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest