The house became a shack : घराचे बनले कोंडवाडे

शाळा सुटल्यानंतर लहान मुलांचा बहुतांश वेळ कसा जातो? गृहपाठ आणि अभ्यास झाल्यावर त्यांना खेळायला जाण्यापासून कसे काय अडवता येऊ शकते? मात्र इंग्लंडमध्ये एका गावात पालक आपल्या पोटच्या मुलांनाच कैद्यासारखे डांबून ठेवतात. त्यांना घराबाहेर पडून परिसरात जाऊ दिले नाही एवढेच काय गल्लीतही मित्रांसोबत खेळू दिले जात नाही.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Fri, 14 Apr 2023
  • 03:00 pm
घराचे बनले कोंडवाडे

घराचे बनले कोंडवाडे

खड्ड्यांमुळे गावातील मुलांना घडतोय कारावास; सुरक्षिततेअभावी नाकारतात खेळण्याची संधी

#लंडन

शाळा सुटल्यानंतर लहान मुलांचा बहुतांश वेळ कसा जातो? गृहपाठ आणि अभ्यास झाल्यावर त्यांना खेळायला जाण्यापासून कसे काय अडवता येऊ शकते? मात्र इंग्लंडमध्ये एका गावात पालक आपल्या पोटच्या मुलांनाच कैद्यासारखे डांबून ठेवतात. त्यांना घराबाहेर पडून परिसरात जाऊ दिले नाही एवढेच काय गल्लीतही मित्रांसोबत खेळू दिले जात नाही.

लहान मुलांना १० मिनिटे घरात बसवणे अशक्य आहे, एकदा का शाळेतून आले की, कसेतरी आवरायचे आणि मग थेट बाहेर मित्रांसोबत खेळायला जायचे हा जणू त्यांचा रोजचा उपक्रमच असतो. अनेकदा तर पालकांनाही मुलांना भेटणे कठीण होऊन बसते. त्यात पालक विचार करतात की जाऊ देत, निदान घरात बसून टीव्ही आणि फोनमध्ये तर डोके घालण्यापेक्षा मैदानावर खेळायला गेलेले चांगले. मात्र थार्प हॅम्लेट गावात यातील काहीच घडत नाही. इथे मुलांचे पालक मुलांना घराबाहेर पडू देत नाहीत. आपल्या मुलाने घरातच राहावे असे त्यांना वाटते अन् त्यासाठी अक्षरशः घरचे लोक त्यांना घरात डांबून ठेवतात. जगातील हे अनोखे ठिकाण म्हणजे युनायटेड किंगडममधील नॉर्विच इथे असलेले एक गाव. थॉर्प हॅम्लेट असे या अनोख्या गावाचे नाव आहे. जिथे आई-वडील मुलांना इच्छा असूनही घराबाहेर पडू देत नाहीत.

शिवाय लहान मुलांचे वयच मुळात खेळायचे आणि बागडायचे असते. त्यांना उगाच घरात बसवून ठेवण्यात अर्थ तरी काय? मुलांच्या पालकांचीही इच्छा असते की, आपल्या मुलाने आपल्या मित्रांसोबत बाहेर मोकळ्या वातावरणात खेळावे जेणेकरून तो केवळ मानसिकच नव्हे तर शारीरिकदृष्ट्याही निरोगी राहील.

पण तरीही पालक मुलांना घराबाहेर पडू देत नाहीत. कारण  हे गाव अतिशय असुरक्षित ठिकाणी वसले आहे. त्यामुळे मुले घरी परततील की नाही, अशी भीती पालकांच्या मनात कायम आहे. गावातील लोकांच्या म्हणण्यानुसार, गावातील घरांबाहेरील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. हे खड्डे १२-१५ फूट खोल आहेत आणि यांना सिंकहोल म्हणून संबोधले जाते. अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. त्यामुळे या अपघाताचा बळी कोण होणार, अशी भीती नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे लोक आपल्या मुलांना घराबाहेर पडू देत नाहीत.

गावातील रहिवाशांनी सरकारला या क्षेत्राच्या संरक्षणासाठी पावले उचलण्याची विनंती केली आहे. रहिवाशांपैकी एकाच्या घराबाहेरील बागेतील एक झाड अचानक जमिनीवर पडून १२ फूट खोल खड्डा झाल्यामुळे त्यांना या सिंकहोलची माहिती मिळाल्याचे गावातील लोकांचे म्हणणे आहे. या अपघातानंतर ग्रामस्थांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पण, सध्या शासनाने खड्डे बुजवण्याच्या बाजूने रेझिस्टन्सही बसवले आहेत. पण तरीही गावे खूप घाबरलेली आहेत. सिंकहोलमुळे आमचे जीवन कधीही संपुष्टात येऊ शकते, असे इथे राहणारे लोक सांगतात.वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest