हवामान बदलाचे चटके...
हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढ याचे दुष्परिणाम अनेक देशांना भोगावे लागत आहेत. याला अमेरिका तरी कशी अपवाद असणार? आकाराने देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या लेक पॉवेलमधील पाण्याने यंदा प्रथमच निचांकी पातळी गाठली आहे. ॲरिझोना आणि दक्षिण उटाह खोऱ्यातून वाहणाऱ्या कोलोरॅडो नदीमुळे सहा ते आठ राज्यांची तहान भागते.