एका बातमीची किंमत ५८ हजार कोटी
#न्यूयॉर्क
अमेरिकेतील फॉक्स न्यूज या वृत्तवाहिनीला एक चुकीची बातमी दाखवल्याबद्दल मोठी रक्कम द्यावी लागली आहे. डिममिनियन कंपनीसोबत त्यांचा सुरू असलेला वाद आणि कोर्टातील मानहानीच्या खटला सांमजस्याने सोडवण्यात आला . पण या दरम्यान मीडिया कंपनीला तब्बल ७८७ मिलीयन डॉलर म्हणजेच ५८,०५९ कोटी रुपये दंड म्हणून द्यावे लागणार आहेत. एखाद्या चुकीच्या बातमीसाठी माध्यम समूहाला एवढा मोठा भुर्दंड सोसावा लागल्याची ही पहिलीच मोठी घटना आहे.
या प्रकरणानंतर डोमिनियन वोटिंग सिस्टम्स सोबत फॉक्स न्यूजने केलेली ५८,०५९ कोटी रुपयांची सेटलमेट ही अमेरिकन इतिहासात एखाद्या मीडिया कंपनीसंबंधीत सार्वजनिक स्वरुपात झालेली सर्वात मोठी मानहानी सेटलमेंट ठरली आहे. डोमिनियन कंपनीने न्यूज चॅनलवर १.६ अब्ज डॉलरच्या मानहानीचा खटला दाखल केला होता. डेलावेयर सुपीरयर कोर्टाच्या ज्यूरीने शपथ घेतल्याच्या काही तासानंतर दोन्ही पक्षात सेटलमेंटची घोषणा करण्यात आली. दुपारच्या लंच ब्रेकदरम्यान तब्बल तीन तास न्यायालयाचे कामकाज थांबले होते. यादरम्यानच दोन्ही पक्षात सेटलमेंट करण्यात आली. यानंतर दोन्ही पक्षांच्या १२ सदस्यांच्या ज्युरीना या सेटलमेंटची माहिती देण्यात आली. यानंतर कोर्टातील केस रद्द करण्यात आली.
कोर्ट फायलींगनुसार सांगण्यात आले होते की, ७८७.५ मिलियन डॉलर ही रक्कम डोमिनियन कंपनीने मागितलेल्या १.६ अब्ज डॉलरच्या अर्धी आहे. मात्र ती २०१८ मध्ये कंपनीच्या मुल्यांकनाच्या तब्बल १० पट आहे आणि २०२१ मध्ये वार्षिक उत्पन्नाच्या तब्बल आठ पट आहे. डोमिनियन कंपनीने दावा केला होता की फॉक्स न्यूजने खोटी बातमी दिल्याने कंपनीचे अब्जावधींचे नुकसान झाले आहे.
वादी आणि प्रतिवादींनी आपापसात प्रकरण मिटवल्यावर आता कोर्टात सुनावण्या होणार नाहीत. या सेटलमेंट कागदपत्रांवर साक्षीदार म्हणून फॉक्स न्यूजतर्फे फॉक्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि माध्यम सम्राट रुपर्ट मर्डोक आणि त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी लाचलान मर्डोक आणि फॉक्स न्यूजचे संयोजक सीन हैनिटी आणि टकर कार्लसन यांची नावे आहेत.
वृत्तसंस्था