नवनिर्माणाची किंमत...
रशियाने युक्रेनसोबत छेडलेल्या युद्धाला वर्ष उलटून गेले आहे. या हल्ल्यांत बेचिराख झालेली शहरे, काळवंडलेल्या इमारती आणि दहशतीने मोडलेला सर्वसामान्य युक्रेनियन नागरिकाचा आत्मविश्वास जागवण्यासाठी १४.१ अब्ज डॉलरची गरज भासणार आहे. युक्रेनच्या वित्तमंत्र्याने हा निधी उभारण्यासाठी जगभरातील मित्र देशांकडे याचना केली आहे.