वूहानच्या प्रयोगशाळेत कोरोना व्हायरसचा जन्म
#पेंटागॉन
जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाच्या महामारीपासून आता कुठे मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केली आहे. काही देशांत अजूनही या साथीचा प्रादुर्भाव सुरू आहे. काही देशांनी व्हायरसला रोखणाऱ्या लशींच्या मदतीने संसर्ग रोखला आहे. हा व्हायरस विस्तारवादी चीनने बनवला असल्याची चर्चा पूर्वीपासून केली जात होती. मात्र आता अमेरिकेने या संदर्भात काही पुरावे समोर आणत त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रकाशित एका अहवालात अमेरिकेने कोरोना व्हायरस हा चीनने आपल्या वूहानच्या प्रयोगशाळेत बनवला असल्याचा दावा केला आहे. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करण्यासाठी चीनने व्हायरस विकसित करून या आधुनिक शस्त्राच्या माध्यमातून आपले काम साधले असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने या संदर्भात सविस्तर तपास केला आहे. ऊर्जा विभागाने अमेरिकेच्या हेर विभागाच्या मदतीने हा अहवाल तयार केला आहे. ज्यात चीनच्या वुहानच्या प्रयोगशाळेत कोरोनाचा व्हायरस कसा विकसित करण्यात आला, याबाबतचे काही पुरावे जोडण्यात आले आहेत. हा अहवाल नुकतेच व्हाईट हाऊस आणि प्रमुख खासदारांकडे सोपवण्यात आला आहे.
या अहवालात कोरोना व्हायरसची निर्मिती, त्याचा प्रसार याबाबतची विविध मते मांडण्यात आली आहेत. कोरोनाचा व्हायरस हा चीननेच बनवला असल्याबाबत अमेरिकेच्या गुप्तचर विभागात एकवाक्यता आहे. चीनने हा व्हायरस वुहानच्या प्रयोगशाळेत बनवला. मात्र एका अपघातामुळे त्याचा प्रसार झाला. फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन विभागाच्या मते, चीनने हा व्हायरस विकसित केला होता. मात्र प्रयोगशाळेत झालेल्या अपघातामुळे त्याचा प्रसार झाला. २०१९ लाच अमेरिकेने कोरोना व्हायरसच्या प्रसारासाठी चीनला दोषी ठरवले होते. त्यानंतर जगभरातून चीनकडे संशयाच्या नजरेतून पाहिले गेले.
प्रतिस्पर्ध्यांचे नुकसान करण्याचे नवे माध्यम
आधुनिक काळात युद्धासाठी आपल्या शत्रू देशाला कमकुवत करण्यासाठी त्याच्यावर अणुबॉम्ब टाकण्याची गरज नाही. असा एखादा व्हायरस सोडायचा आणि होणारे नुकसान बघत बसायचे. कोरोना व्हायरसने तसेच घडले आहे. अनेक विकसित देशांच्या अर्थव्यवस्था मोडकळीस आल्या आहेत. भारतासारख्या देशाने त्यावर त्वरित प्रतिबंधात्मक लस विकसित केली. मात्र इतर अनेक देशांची काम करणारी जनता ताळेबंदीचा शिकार बनली आणि त्या देशांची आर्थिक गाडी रुळावरून घसरली. जगातील अनेक देश आजही या महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडलेले नाहीत. शत्रू देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचे हे नवे हत्यार पारंपरिक अस्त्रांपेक्षा अधिक घातक आहे. वृत्तसंंस्था