थेट पर्यटनमंत्र्यांनीच दिले अटकेचे आदेश
#रोम
ऐतिहासिक गडकिल्ल्यांवर जाऊन तिथल्या इतिहासाच्या पाऊलखुणांवर आपली नावे कोरणे आणि आपला समृद्ध ठेवा खराब करण्याची पद्धत भारतात खपवून घेतली जात असेल, मात्र इटलीत असा प्रकार करणाऱ्याला तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश तिथल्या पर्यटनमंत्र्यांनी दिले आहेत.
इटलीमध्ये एका पर्यटकाने त्याचे आणि त्याच्या प्रेयसीने नाव रोममधल्या एका प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तूच्या भिंतीवर कोरले. हा प्रताप करत असताना त्याने एक व्हीडीओही केला. हा व्हीडीओ व्हायरल झाला आणि तो इटलीच्या संस्कृती, पर्यटन मंत्र्यांनी बघितला.
'इव्हान+हेली २३' असा मजकूर या पर्यटकाने भिंतीवर कोरला होता. ऑरेंज, कॅलिफोर्निया येथील रायन लुट्झ या सहकारी पर्यटकाने या घटनेचे छायाचित्रण केले आणि युट्युब व रेडीटवर व्हीडीओ पोस्ट केला. हा व्हीडीओ दीड हजारांहून अधिक लोकांनी पाहिला. इटालियन माध्यमांनीही तो उचलून धरला आणि अशा प्रकारे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक स्मारकाची विटंबना झाल्याबद्दल निषेधही व्यक्त केला.
वृत्तसंस्था