शिक्षिका बनल्या भक्षक
#डेनव्हिले
अमेरिकेत मागच्या दोन दिवसांत सहा महिला शिक्षकांना विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्यामुळे अटक करण्यात आली आहे. आपल्या विद्यार्थ्यांसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
या महिला शिक्षकांनी विद्यार्थ्यांना धमकी देऊन, दहशत निर्माण करून शाळेच्या परिसरात आणि बाहेर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले असल्याची तक्रार पालकांनी शाळेकडे केली आहे. त्यानुसार पोलिसांनी या सहाजणींवर कायदेशीर कारवाई केली आहे. डेनव्हिले येथील ३८ वर्षीय ॲलन शेलवर अत्यंत रानटीपणे विद्यार्थ्यावर बलात्कार केला असल्याचा आरोप आहे. शेलने १६ वर्षीय विद्यार्थ्यावर तीन वेळा असा बलात्कार केला असल्याचे पीडिताच्या पालकांचे म्हणणे आहे. तशी रीतसर तक्रारही त्यांनी दाखल केली आहे. डेनव्हिलेच्या जिल्हा न्यायालयात या खटल्याची सुनावणी पार पडली आहे.
शेल ही वूडलॉन एलिमेंटरी स्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे. यापूर्वी शेलने लॅंकेस्टर एलिमेंटरी स्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम केलेले आहे. मात्र या शाळेतही तिने विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकार उघडकीस आले होते, त्यामुळे तिची हकालपट्टी करण्यात आली होती. दरम्यान बॉयल काऊंटी स्कूलमधील शिक्षकावरही असाच आरोप करण्यात आला आहे. मागच्या आठवड्यात सहा शिक्षकांना विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
दरम्यान अमेरिकेतील शालेय विद्यार्थ्यांवर शिक्षकांकडून होणारे बलात्कार हे तसे नेहमीच होणारे प्रकार आहेत. कारण लैंगिक शिक्षणाचे हे प्रकार म्हणावे तेवढ्या प्रमाणात उघडकीस येत नाही. विद्यार्थी भीतीपोटी शिक्षकांच्या विरोधात शाळा व्यवस्थापनाकडे तक्रारी करत नसल्याची भावना समुपदेशक पॅट्रिक निकोल्सन यांनी व्यक्त केली आहे. वृत्तसंस्था