खाते सुरू ठेवण्यासाठी राहा 'अक्टिव्ह'
#कॅलिफोर्निया
ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून त्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. कर्मचाऱ्यांच्या कपातीचा निर्णय असो, किंवा ब्लू टीक हटवण्याचा निर्णय असो, यांसारखे अनेक निर्णय त्यांनी घेतले आहेत. आता ट्वीटर लवकरच इनअक्टिव्ह अकाउंट्स बंद करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मस्क यांनी नुकतेच ट्वीट करून याबद्दलची माहिती दिली. वर्षानुवर्षे निष्क्रिय असलेले अकाउंट्स बंद केली जाणार आहेत. दरम्यान ट्वीटरवर अशी हजारो अकाउंट्स आहेत , ज्यावर कोणतीही पोस्ट शेअर केली जात नाही. जो कोणी आपले अकाऊंट नियमितपणे वापरत नाहीत त्यांच्या फॉलोअर्सची संख्या लवकरच कमी होऊ शकते. आपले अकाऊंट कायमचे बंद होण्यापासून रोखण्यासाठी महिन्यातून किमान एकदा वापरकर्त्यांना त्यांच्या अकाऊंटवर लॉग इन करणे आवश्यक ठरणार आहे.