मोदींसाठी व्हाईट हाऊसमध्ये स्टेट डिनर
#वॉशिंग्टन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये स्टेट डिनरचे आयोजन केले होते. मोदींच्या अमेरिका दौऱ्याचा हा तिसरा दिवस होता. यावेळी त्यांनी भोजनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
मोदी म्हणाले, 'विशेष आदरातिथ्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. पाहुणचाराने प्रभावित होऊन लोक गाणे म्हणू लागतात हे मी पाहिले आहे. माझ्याकडेही गाण्याची कला असती तर मी गाणे गायले असते. भारतीय वंशाचे लोक प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत. हळूहळू दोन्ही देशांचे लोक एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेत आहेत. मोदी आणि बायडेन यांनी दोन महान देशांच्या भागिदारी, मैत्री, विकासचा गौरव केला. यावेळी मोदींनी आल्याचे पाणी (जिंजर वॉटर) प्यायले. यावेळी फर्स्ट लेडी जिल बायडेन, भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी, आनंद महिंद्रा यांच्यासह २०० पाहुणे उपस्थित होते.
मागच्या वेळी जेव्हा माझ्यासाठी अमेरिकेत मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा तो माझा नवरात्रीचा उपवास होता. मी काहीही खाल्ले नव्हते. तुम्ही विचारले होते की मी काही खाणार नाही का, पण मी तसे करू शकत नव्हतो. पण नंतर मला प्रेमाने खाऊ घालण्याची तुमची इच्छा पूर्ण झाली,’’ असे मोदी यांनी आवर्जून नमूद केले.
बायडेन यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या 'वेयर द माइंड इज विदाउट फियर' या कवितेतील उतारे वाचले. ते म्हणाले, ‘‘भारत-अमेरिका संबंधातील हे नवे पर्व आहे. मी पंतप्रधान मोदींसोबत खूप छान वेळ घालवला. दोन्ही देशांमधील संबंध आम्हाला आणखी पुढे न्यायचे आहेत.’’
वृत्तसंस्था