स्पाईस जेटच्या कर्मचाऱ्याने प्रवाशाचे पैसे चोरले

दुबई ते पुणे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या बॅगचे कुलूप तोडून ७ हजारांची रोख रक्कम चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लोहगाव विमानतळावरील स्पाईस जेट एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SpiceJet employee theft, passenger money stolen, SpiceJet staff misconduct, SpiceJet incident, employee steals money, SpiceJet passenger complaint, money theft airline, Civic Mirror

File Photo

दुबई ते पुणे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या बॅगचे कुलूप तोडून ७ हजारांची रोख रक्कम चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लोहगाव विमानतळावरील स्पाईस जेट एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अर्जुन धोंडिबा जगताप (वय ४७, रा. विमान नगर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. हा प्रकार लोहगाव विमानतळावर स्पाईस जेट विमान क्रमांक एसजी ५२ मध्ये मंगळवारी मध्यरात्री बारा वाजून दहा मिनिटे ते पहाटे साडेचारच्या सुमारास घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जगताप यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. ते स्पाईस जेट विमानाने दुबईहून लोहगाव विमानतळावर उतरले. त्यांची बॅग पट्ट्यावरून आली तेव्हा बॅगेचे कुलूप तुटलेले दिसून आले. त्यांनी बॅगेतील सामानाची तपासणी केली असता, बॅगेत ठेवलेले सात हजार रुपये चोरीला गेल्याचे आढळले.

त्यावेळी जगताप यांनी सीआयएसएफ आणि कस्टमच्या कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. बॅगेचे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले. याबाबत विमान कंपनीकडून काहीही खुलासा न झाल्याने जगताप यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश साळुंखे करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest