रशियाला मिसाइल देऊन इराण घेते गहू-सोयाबीन.

तेहरान : रशिया-युक्रेन युद्ध सुरू होऊन काही वर्षे झाली असून ते मिटण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. युद्धाच्या निमित्ताने जगातील देश विभागले गेले आहेत. अमेरिकेने प्रतिबंध घातलेले इराण आणि रशिया हे दोन देश सामानांची अदलाबदल करून आपली गरज भागवत आहेत.

Russia-Ukraine War Impact, Iran Russia Trade Relations, US Sanctions Effects, Russia Missiles Supply, Iran Wheat Soybeans Trade, Civic Mirror

File Photo

अदलाबदलीच्या व्यवहारावर इराणच्या खासदाराने केले शिक्कामोर्तब

तेहरान : रशिया-युक्रेन युद्ध सुरू होऊन काही वर्षे झाली असून ते मिटण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. युद्धाच्या निमित्ताने जगातील देश विभागले गेले आहेत. अमेरिकेने प्रतिबंध घातलेले इराण आणि रशिया हे दोन देश सामानांची अदलाबदल करून आपली गरज भागवत आहेत. इराण रशियाला मिसाइलचा पुरवठा करून त्या बदल्यात इराणला गहू, सोयाबीन देत आहे. या अदलाबदलीच्या व्यवहारास इराणचे खासदार अहमद बख्शायेश  अर्देस्तानी यांनी दिला दुजोरा. 

 युद्धात काही देश रशियाच्या तर काही देश युक्रेनच्या बाजूने आहेत. युक्रेनला अमेरिका आणि नाटो देशांकडून आर्थिक तसेच लष्करी मदत दिली जात आहे. रशियाला इराणकडून थेट लष्करी मदत मिळते असा दावा अनेकदा करण्यात आला आहे. इराणने रशियाला मिसाइल आणि ड्रोनचा पुरवठा करत असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याची पुष्टी झालेली नाही. आता इराणच्या एका खासदाराने यावर शिक्कामोर्तब केले असून इराण रशियाला बॅलेस्टिक मिसाइल पुरवत असल्याचे मान्य केले आहे. अहमद बख्शायेश अर्देस्तानी असे त्यांचे नाव असून ते इराणच्या संसदेचे तसेच राष्ट्रीय सुरक्षा, विदेश धोरण समितीचे सदस्य आहेत.

इराण रशियाला ड्रोन, मिसाइल देत असल्याचे अमेरिकेच्या  द वॉल स्ट्रीट जर्नल या वृत्तपत्राने म्हटलं आहे. इराणने हे वृत्त फेटाळून लावले आहे. आता इराणच्या खासदाराने ते मान्य करून देशाला तोंडघशी पाडले आहे. अर्देस्तानी म्हणतात, आम्हाला आमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सामानाच्या बदल्यात सामानाची अदलाबदल करावी लागते. सोयाबीन-गहू सारख्या गोष्टी आम्हाला त्यांच्याकडून घ्याव्या लागतात. रशियाला मिसाइल निर्यात हा आमच्या देवाण घेवाणीचा भाग आहे. अर्देस्तानी यांनी ‘दिदवाना इराण’ ला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे.

अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी इराणवर अनेक प्रतिबंध घातले आहेत. त्यामुळे ते डॉलरने व्यापार करू शकत नाहीत. इराण सामानाच्या बदल्यात सामान देऊन आपल्या गरजा पूर्ण करतो. रशियाला क्षेपणास्त्र पुरवठा केल्यास इराणवर आणखी प्रतिबंध येऊ शकतात, या प्रश्नावर अर्देस्तानी म्हणाले की, यापेक्षा अजून काय वाईट होऊ शकतं? आम्ही हिजबुल्लाह, हमास आणि हशद अल-शाबीला क्षेपणास्त्र देतो, मग रशियाला का नाही देऊ शकत?

आम्ही शस्त्र विकून डॉलर घेतो. रशियासोबतच्या भागीदारीमुळे प्रतिबंधाने काही फरक पडत नाही. आम्ही रशियाकडून सोयाबीन, मक्का आणि अन्य सामानाची आयात करतो. युरोपियन देश युक्रेनला शस्त्र विकतात. नाटो युक्रेनमध्ये घुसला आहे.  आम्ही आमचा सहकारी रशियाला मिसाइल, ड्रोन देऊन मदत करू शकत नाही का, असा प्रश्नही अर्देस्तानी यांनी विचारला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest