मॉस्को : कमला हॅरिस यांना पुतिन यांचा पाठिंबा, ट्रम्प यांच्याप्रमाणे रशियावर आर्थिक निर्बंध लादणार नसल्याची अपेक्षा

अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जवळ येत असताना त्यात रंग भरत आहे. एकेकाळच्या जागतिक शीतयुद्धात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या रशियानेही आता या निवडणुकीत भाग घेतल्याचे दिसत असून अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना पाठिंबा दर्शवला आहे.

Kamala Harris Putin support, Putin's backing for Harris, Kamala Harris vs Trump, Russia economic sanctions, Harris stance on Russia, Trump vs Harris policies, Russia sanctions debate, Putin support for candidates, Civic Mirror

File Photo

मॉस्को : अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जवळ येत असताना त्यात रंग भरत आहे. एकेकाळच्या जागतिक शीतयुद्धात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या रशियानेही आता या निवडणुकीत भाग घेतल्याचे दिसत असून अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना पाठिंबा दर्शवला आहे.

रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे अध्यक्ष असताना रशियावर आर्थिक निर्बंध लादले होते. त्यांच्या आधी कोणत्याही अमेरिकी अध्यक्षाने रशियावर एवढे निर्बंध लादले नव्हते. त्यामुळे ट्रम्प यांच्या विरोधात रशियात नाराजी असून पुतिन यांच्या वक्तव्यातून त्याचे दर्शन झाले. व्लादिवोस्तोक  येथे ईस्टर्न इकॉनॉमिक फोरमला उपस्थित असलेल्या पुतिन यांना अमेरिकेचे पुढील अध्यक्ष म्हणून आपण कोणाला पसंती द्याल, या प्रश्नाला उत्तर देताना पुतिन यांनी वरील विधान केले. ते म्हणाले, तुम्ही मला आधी विचारले असते तर मी अध्यक्ष बायडेन यांचे नाव घेतले असते. आता त्यांनी रिंगणातून माघार घेतली असल्याने आपला कमला हॅरिस यांना पाठिंबा असेल. 

कमला हॅरिस यांच्याबद्दल ते म्हणाले की, त्या खूप मोकळेपणाने हसतात. यावरून त्यांच्या आयुष्यात सर्व काही चांगले चालले असल्याचे अनुमान काढता येते. जर त्या सर्व योग्य निर्णय घेणार असतील तर त्या ट्रम्प यांच्याप्रमाणे रशियावर निर्बंध लादणार नाहीत. कदाचित अशा गोष्टी त्या टाळतील. अर्थात, अमेरिकेचे अध्यक्ष कोण व्हावे हे निवडण्याचे काम शेवटी अमेरिकी नागरिक करणार आहेत. आपल्याला अमेरिकी लोक अध्यक्ष म्हणून ज्याची निवड करतील त्याचा आपणाला आदर असेल.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी २१ जुलै रोजी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले होते. देश आणि पक्षाच्या हितासाठी आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. वाढते वय आणि मतदारांवरील प्रभाव याचा विचार करून त्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यातच अध्यक्षीय निवडणुकीच्या पहिल्या चर्चेत ट्रम्प यांच्या तुलनेत त्यांची कामगिरी खूप सुमार झाली. त्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाच्या अनेक नेत्यांनी बायडेन यांच्या माघारीचा प्रस्ताव पुढे ठेवला होता.

माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनीही बायडेन यांना अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्यास सांगितले होते. वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर बायडेन यांनी अखेर माघार घेतली. त्यामुळे त्यांच्या जागी डेमोक्रॅटिक पक्षाने उपाध्यक्षा कमला हॅरिस यांची अध्यक्षीय निवडणुकीसाठी निवड केली.

अमेरिकेत या वर्षी अध्यक्षपदाची निवडणूक असून त्यासाठी मतदान ५ नोव्हेंबरला होणार आहे. मतदानाचा निकाल ६ जानेवारी २०२५ रोजी येईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१७ ते २०२१ दऱ्यान अध्यक्ष म्हणून काम केले आहे. ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वयस्कर अध्यक्षपदाचे उमेदवार  असून ते तिसऱ्यांदा ही निवडणूक लढवत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest