...म्हणून पाकिस्तानचा झाला तिळपापड

सौदी अरेबियाच्या भूमीवर प्रथमच भारतीय लढाऊ विमाने उतरवण्यात आली. २६ फेब्रुवारी रोजी भारतीय लढाऊ विमानांचा एक ताफा रियाधच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला. आजवर सौदी अरेबियात भारतीय लढाऊ विमाने कधीही उतरली नव्हती. भारत आणि सौदी अरबमधील प्रस्थापित होणाऱ्या मैत्रीपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर भारतीय विमानाच्या या 'फ्रेंडली स्टॉपओव्हरकडे पाहिले जात आहे. यामुळे पाकिस्तानची झोप उडाली असल्याची चर्चा आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 3 Mar 2023
  • 07:30 am
...म्हणून पाकिस्तानचा झाला तिळपापड

...म्हणून पाकिस्तानचा झाला तिळपापड

सौदीत प्रथमच उतरला भारतीय विमानांचा ताफा

#रियाध

सौदी अरेबियाच्या भूमीवर प्रथमच भारतीय लढाऊ विमाने उतरवण्यात आली. २६ फेब्रुवारी रोजी भारतीय लढाऊ विमानांचा एक ताफा रियाधच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला. आजवर सौदी अरेबियात भारतीय लढाऊ विमाने कधीही उतरली नव्हती. भारत आणि सौदी अरबमधील प्रस्थापित होणाऱ्या मैत्रीपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर भारतीय विमानाच्या या 'फ्रेंडली स्टॉपओव्हरकडे पाहिले जात आहे. यामुळे पाकिस्तानची झोप उडाली असल्याची चर्चा आहे.

भारतीय हवाई दलाच्या ८ लढाऊ विमानांचा ताफा सौदी अरबच्या विमानतळावर उतरला. या ताफ्यात ५ मिराज-२०००, २ सी-१७ आणि एका आयएल-७८ प्रकारच्या विमानाचा समावेश आहे. इथे या विमानात इंधन भरण्यात आले. उड्डाणापूर्वीच्या संरक्षक चाचण्या घेण्यात आल्या आणि हा ताफा पुढे रवाना झाला. ब्रिटनने आयोजित केलेल्या 'कोब्रा वॉरियर्स-२३' या संयुक्त हवाई शक्तिप्रदर्शनात सहभागी होण्यासाठी हा ताफा निघाला होता. दरम्यानच्या प्रवासात हा ताफा रियाध आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबवण्यात आला. इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे.      

या ऐतिहासिक घटनेनंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. सौदी अरबने संरक्षणविषयक धोरणात पाकिस्तानला नेहमीच झुकते माप दिलेले आहे. तर भारतापासून अंतर राखून वर्तन केलेले आहे. पाकिस्तान लष्कर सौदीच्या लष्कराला प्रशिक्षण देण्याचे काम करते. त्यामुळे सौदीत पाकिस्तानी लष्कराच्या काही तुकड्या हजर असतात. या मोबदल्यात पाकिस्तान सौदीकडून आर्थिक मदत घेत असते. या पार्श्वभूमीवर सौदीने भारताच्या लढाऊ विमानांना आपली भूमी वापरू दिली आहे. सौदीला भारतासोबत मैत्री वाढवायची आहे. भारताचे सौदीतील राजदूत डॉ. सुहेल एजाज खान, कर्नल जी. एस. ग्रेवाल आणि सौदीच्या हवाईदलातील काही अधिकाऱ्यांनी यावेळी या भारतीय हवाई ताफ्याचे स्वागत केले. भारत-सौदी संबंधांबाबत चर्चा केली.   

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest