धक्कादायक: कर्करोग नसतानाही केली केमोथेरपी, घटना वाचून तुमचा थरकाप उडेल

टेक्सास: अमेरिकेतील टेक्सासमधील धक्कादायक घटना वाचून तुमचा थरकाप उडेल. येथे एका महिलेवर न झालेल्या आजारासाठी उपचार करण्यात आले आणि आता या पीडित महिलेला याचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत.

संग्रहित छायाचित्र

न झालेल्या आजारावर केले उपचार; महिलेच्या पदरी दुष्परिणामांचे संकट

टेक्सास: अमेरिकेतील टेक्सासमधील धक्कादायक घटना वाचून तुमचा थरकाप उडेल. येथे एका महिलेवर न झालेल्या आजारासाठी उपचार करण्यात आले आणि आता या पीडित महिलेला याचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत.

येथील एका महिलेच्या पॅथॉलॉजी रिपोर्टमध्ये ती महिला कॅन्सरने ग्रस्त असल्याचे समोर आले होते. यानंतर महिलेवर केमोथेरपी उपचार सुरू करण्यात आले, मात्र या महिलेला कॅन्सरच झाला नसल्याचे आता समोर आले आहे. मात्र, केमोथेरपीचे उपचार घेतल्याने या महिलेच्या डोक्यावरील सर्व केस गळून केले आहेत. त्याचबरोबर महिलेची त्वचाही खराब झाली आहे. या प्रकरणातून डॉक्टरांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. ज्याचा फटका या महिलेला बसला आहे.

अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या महिलेला सतत पोटदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे २०२२ मध्ये ती एका रुग्णालयात दाखल झाली. किडनी स्टोनच्या समस्येमुळे हा त्रास होत असल्याची महिलेला शंका होती. त्यामुळे किडनी स्टोनची चाचणी केली. अहवालात किडनी स्टोन असल्याचेही समोर आले, परंतु महिलेची स्प्लिन मोठी झाल्याचे आढळून आले. यानंतर गेल्या वर्षी जानेवारीमध्ये महिलेच्या प्लीहावर शस्त्रक्रिया करून अतिरिक्त भाग काढण्यात आला. शस्त्रक्रियेतून काढलेला प्लीहाचा अतिरिक्त भाग तपासणीसाठी पाठवण्यात आला. तीन पॅथॉलॉजी लॅबच्या अहवालात याचे योग्य निदान झाले नाही. तेव्हा ते चौथ्या लॅबमध्ये पाठवण्यात आले, तेथे या महिलेला कॅन्सर असल्याचे सांगण्यात आले.  यानंतर रुग्णालयात महिलेची केमोथेरपी सुरू करण्यात आली. दरम्यान पहिल्या केमोथेरपीनंतर महिलेचे सर्व केस गळून पडले आणि दुसऱ्या केमोथेरपीदरम्यान महिलेची त्वचा खराब झाली.

एप्रिलमध्ये जेव्हा ही महिला नियमित तपासणीसाठी रुग्णालयात गेली तेव्हा महिलेला सांगण्यात आले की तिला कर्करोग नव्हताच. हे ऐकून महिलेला धक्का बसला. यानंतर रुग्णालयाने अत्यंत निष्काळजीपणा दाखवल्याचे महिलेचे म्हणणे आहे. महिलेने सांगितले की, तिच्या दुसऱ्या केमोथेरपीपूर्वीच लॅबचा रिपोर्ट हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता, पण हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी रिपोर्टकडे पाहिलेही नाही आणि तिला केमोथेरपी दिली.

केमोथेरपी म्हणजे काय?

केमोथेरपी ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे जी बऱ्याचदा कर्करोगासारख्या गंभीर आजारांच्या उपचारांमध्ये वापरली जाते. ही एक तांत्रिक प्रक्रिया आहे. ज्यामध्ये शरीराच्या कोणत्याही भागात अनियमितपणे वाढणाऱ्या पेशी नष्ट करण्यासाठी विशेष औषधे वापरली जातात. केमोथेरपीचा मुख्य उद्देश म्हणजे अनियमितपणे वाढणाऱ्या पेशी नष्ट करणे किंवा कमी करणे हा असतो. कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी हे तंत्र वापरले जाते. केमोथेरपीमध्ये विविध औषधे असतात, जी शरीरात वेगवेगळ्या प्रकारे दिली जातात, जसे की इंजेक्शनद्वारे, तोंडाने किंवा ओतणे. ही औषधे वाढत्या पेशी नष्ट करतात आणि कर्करोगाशी लढण्यास मदत करतात, परंतु प्रक्रियेदरम्यान काही दुष्परिणाम होऊ शकतात, जसे की केस गळणे, मळमळ, थकवा आणि वृद्धत्वाची वारंवार चिन्हे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest