खंडणीसाठी स्वयंघोषित 'क्रिप्टो किंग'चे अपहरण

कॅनडामधील स्वयंघोषित 'क्रिप्टो किंग' एडन प्लेटर्स्कीचे डिसेंबरमध्ये ३ दशलक्ष डॉलर खंडणीसाठी अपहरण झाल्याचा दावा त्याच्या वडिलांनी केला आहे. खंडणीसाठी २३ वर्षीय एडनला ताब्यात घेऊन त्याला जबर मारहाण झाल्याचे त्याच्या वडिलांच्या म्हणणे आहे. हल्लेखोरांनी अपहरण करून त्याच्यावर अत्याचार केले होते, असेही त्याच्या वडिलांच्या हवाल्याने एका अहवालात म्हटले आहे. एडनने गुंतवणुकीच्या नावाने कॅनडातील नागरिकांची फसवणूक केली असून याबाबत त्याची चौकशीही सुरू आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 28 Mar 2023
  • 03:16 pm
खंडणीसाठी स्वयंघोषित 'क्रिप्टो किंग'चे अपहरण

खंडणीसाठी स्वयंघोषित 'क्रिप्टो किंग'चे अपहरण

एडन प्लेटर्स्कीच्या वडिलांचा दावा, अपहरणकर्त्यांनी केली मारहाण

#टोरँटो

कॅनडामधील स्वयंघोषित 'क्रिप्टो किंग' एडन प्लेटर्स्कीचे डिसेंबरमध्ये ३ दशलक्ष डॉलर खंडणीसाठी अपहरण झाल्याचा दावा त्याच्या वडिलांनी केला आहे. खंडणीसाठी २३ वर्षीय एडनला ताब्यात घेऊन त्याला जबर मारहाण झाल्याचे त्याच्या वडिलांच्या म्हणणे आहे.  हल्लेखोरांनी अपहरण करून त्याच्यावर अत्याचार केले होते, असेही त्याच्या वडिलांच्या हवाल्याने एका अहवालात म्हटले आहे.  एडनने गुंतवणुकीच्या नावाने कॅनडातील नागरिकांची फसवणूक केली असून याबाबत त्याची चौकशीही सुरू आहे.

अमूक एवढे पैसे गुंतवा, म्हणजे त्याचा तमूक परतावा मिळेल. एक लाख गुंतवा आणि दोन लाख परत मिळवा, असे आर्थिक प्रलोभन दाखवत गुंतवणूकदारांना भुलवणारे महाभाग अथवा टोळ्या केवळ भारतातच आहेत असे नव्हे. कॅनडासारख्या प्रगत देशांतही असे लोक आढळतात. हल्ली प्रत्येकालाच इझी मनी अर्थात फारसे कष्ट न करता अथवा किमान काळात अधिकाधिक पैसे मिळवण्याची स्पर्धाच सुरू आहे. असे पैसे मिळवण्याच्या नादात एखादा महाभाग लाखो गुंतवणूदारांना चुना लाऊन जातो, कॅनडामध्ये एका अल्पवयीन तरुणाने गुंतवणूकदारांना असेच लुबाडले आहे.  

एडन प्लेटर्स्की हा २३ वर्षांचा तरुण आहे. एडन हा स्वयंघोषित उद्योगपती म्हणून ओळखला जातो. त्यापेक्षा अधिक त्याच्या अय्याशीपणामुळे तो प्रकाशझोतात आलेला आहे. कमी कालावधीत जास्तीत जास्त पैसे कमवू पाहणाऱ्या वर्गाचा प्रतिनिधी म्हणून एडनकडे बघितले जाते. क्रिप्टो या आभासी चलनातून आपण हा पैसा कमावल्याचा आभास निर्माण करत त्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे. गुंतवणूकदारांच्या पैशांतून केवळ चैन केली असल्याचा दावाही तपास अधिकाऱ्यांनी केला आहे.

एडनची गुंतवणूकदारांच्या पैशांवर चंगळ

एडनने पैसे दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवले आणि गुंतवणूकदारांची फसवणूक केली. अपहरणकर्त्यांनी त्याचे अपहरण करून मारहाण केल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले आहे, मात्र कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी अथवा सहानुभूती मिळवण्यासाठीच असा दावा केला जात असल्याचे तपास अधिकारी रॉब स्टेल्झर यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे. 

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest