‘वडापाव’ च्या लोकप्रियतेवर शिक्कामोर्तब

मोजक्याच पैशांत पोटाला आधार देईल असा खाद्यपदार्थ म्हणजे वडापाव. स्वस्तात मस्त, रस्त्यावर सर्वत्र उपलब्ध असलेल्या वडापावला आता जगाच्या सर्वाधिक लोकप्रिय खाद्यपदार्थांमध्ये स्थान मिळाले आहे. जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत वडापावने तेरावा क्रमांक पटकावला आहे. टेस्ट ॲॅटलसच्या जगातील ५० सर्वोत्कृष्ट सँडविचच्या यादीमध्ये मुंबईच्या वडापावने स्थान मिळवले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sun, 5 Mar 2023
  • 02:14 am
‘वडापाव’ च्या लोकप्रियतेवर शिक्कामोर्तब

‘वडापाव’ च्या लोकप्रियतेवर शिक्कामोर्तब

टेस्ट ॲॅटलसच्या यादीत तेरावे स्थान; जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत समावेश

#झाग्रेब

मोजक्याच पैशांत पोटाला आधार देईल असा खाद्यपदार्थ म्हणजे वडापाव. स्वस्तात मस्त, रस्त्यावर सर्वत्र उपलब्ध असलेल्या वडापावला आता जगाच्या सर्वाधिक लोकप्रिय खाद्यपदार्थांमध्ये स्थान मिळाले आहे. जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत वडापावने तेरावा क्रमांक पटकावला आहे. टेस्ट ॲॅटलसच्या जगातील ५० सर्वोत्कृष्ट सँडविचच्या यादीमध्ये मुंबईच्या वडापावने स्थान मिळवले आहे.  

टेस्ट ॲॅटलस ही फूड ट्रॅव्हल गाईड वेबसाईट आहे. यामध्ये जगभरातील पारंपरिक खाद्यपदार्थांसाठी मार्गदर्शक माहिती प्रसिद्ध केली जाते. यावर जगभरातील विविध पाककृती आणि लोकप्रिय पदार्थ याबाबत माहिती दिली. टेस्ट ॲटलस या जागतिक फूड ट्रॅव्हल गाईडच्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत वडापाव तेराव्या क्रमांकावर आहे. या यादीत तुर्कीचे टॉम्बिक सँडविच पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर पेरूचे बुटिफारा सँडविच आणि अर्जेंटिनाचा डी लोमो सँडविचचा तिसरा क्रमांक आहे. या यादीत प्रथमच मुंबईच्या लाडक्या वडापावला स्थान देण्यात आले आहे.

मुंबईतील सर्वात प्रसिद्ध स्ट्रीट फूड म्हणजे वडापाव. मुंबईकरांचे आणि वडापावचे नाते अगदी वेगळेच आहे. आनंदाच्या क्षणी असो वा दु:खाच्या क्षणी, पोटाची भूक भागवण्याचा उत्तम आधार म्हणजे वडापाव. अगदी मुंबईत राहणारी व्यक्ती असो किंवा मुंबईमध्ये फक्त काही वेळ घालवणारी परदेशी व्यक्ती, पण तुम्हाला वडापावबाबत नक्की माहिती असते. तुम्ही कोणत्याही वेळी वडापावचा आस्वाद घेऊ शकता. चहा, नाश्ता असो किंवा जेवण तुम्ही कधीही वडापाव खाऊ शकता. वडापाव हा जणू मुंबईकरांच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनला आहे. अगदी रस्त्यावर राहणारी व्यक्ती असो किंवा श्रीमंत व्यक्ती वडापाव सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे. अशा या मुंबईच्या वडापावला आता जागतिक मान्यता मिळाली आहे. वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest